Dinesh Karthik Injured Rishabh Pant : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थमध्ये झालेल्या सामन्यात भारताला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त झाला आहे. कार्तिक दुखापतीमुळे बाहेर जाऊ शकतो. अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याचे खेळणे संशयास्पद आहे. जरी दिनेश कार्तिक खेळताना दिसला, तरीपण ऋषभ पंतची टीम इंडिया एन्ट्री होणार असे म्हटले जात आहे.
सलामीवीर केएल राहुलच्या जागे पुढील सामन्यात ऋषभ पंत संधी दिल्या जाऊ शकते. केएल राहुल हा महान खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण जर तो फॉर्मशी झुंजत असेल तर ऋषभ पंतला संघात संघात संधी द्यायला हवी. कार्तिक जखमी दिसत आहे, त्याची प्रकृती काय आहे हे माहीत नाही. तो उपलब्ध नसल्यास ऋषभ पंत रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो.
कार्तिकला या स्पर्धेत अजून तरी काही विशेष कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याने 15 चेंडूत केवळ सहा धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 15 षटके संपल्यानंतर कार्तिक वेदनेत दिसला. त्याची पाठ धरली आणि गुडघ्यावर खाली उतरला. हे पाहून टीम इंडियाचे फिजिओ लगेचच त्याला मैदानात आले. यानंतर काही वेळातच कार्तिक पॅव्हेलियनमध्ये परतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.