Dinesh Karthik : 'जपण्यासारख्या अनेक आठवणी...', ​​डीकेने घेतली निवृत्ती ?

दिनेश कार्तिक आता दिसणार नाही निळ्या जर्सीत! सोशल मीडिया पोस्टने दिलेला इशारा
Dinesh Karthik Drops Retirement
Dinesh Karthik Drops Retirementsakal
Updated on

Dinesh Karthik Retirement : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अनौपचारिक घोषणा केली आहे. तामिळनाडूत जन्मलेल्या या क्रिकेटपटूने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांनी हे मान्य केले आहे की, डीके पुन्हा टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दिसणार नाही.

Dinesh Karthik Drops Retirement
Sri Lanka Cricket : नागिन डांस करणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूवर एक वर्षाची बंदी! काय आहे प्रकरण...

दिनेश कार्तिकने त्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यात मदत केल्याबद्दल त्याचे सहकारी, प्रशिक्षक, मित्र आणि चाहत्यांचे पुन्हा आभार मानले आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना डीकेने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भारतासाठी टी-20 विश्वचषक खेळण्याच्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केले आणि हे करणे अभिमानास्पद आहे. आम्ही अंतिम उद्दिष्ट गमावले, परंतु त्यामुळे माझे आयुष्य अनेक आठवणींनी भरले. जपण्यासारख्या अनेक आठवणी मिळाल्या आहेत.

Dinesh Karthik Drops Retirement
Suryakumar Yadav : टीम इंडियाचा 360 डिग्री प्लेयर संघातुन बाहेर! मोठे कारण आले समोर...

दिनेश कार्तिकने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर हार्दिक पांड्या, कृणाल पंड्या, अर्शदीप सिंग यांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. त्याचवेळी, डीके भाई आता निवृत्त झाले आहेत का, हे चाहते लिहित आहेत. डीके 37 वर्षांचा आहे आणि वयाच्या या टप्प्यावर त्याच्यासाठी टीम इंडियामध्ये परत येणे जवळजवळ अशक्य आहे.

Dinesh Karthik Drops Retirement
Shikhar Dhawan: 'कॅप्टन्सी गेली, पण आता...' धवन कुणाबद्दल बोलला?

टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिक ठरला होता फ्लॉप -

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात कार्तिकला पाकिस्तानविरुद्ध केवळ एक धाव करता आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या सहा धावांवर बाद झाल्यानंतर कार्तिकच्या कामगिरीत कोणताही बदल झाला नाही. कार्तिकने आपला शेवटचा टी-20 विश्वचषक सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता आणि त्या सामन्यात तो फक्त सात धावा करू शकला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()