Dinesh Karthik : धोनीनं फोन केला अन् दिनेश कार्तिकचा आनंद गगनात मावेना...

Dinesh Karthik MS Dhoni Commentary
Dinesh Karthik MS Dhoni Commentary esakal
Updated on

Dinesh Karthik MS Dhoni Commentary : भारताचा विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकचे भारतीय संघाचे सर्व दरवाजे आता जवळपास बंद झाले आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन वनडे तसेच टी 20 चा संघ हा भविष्याच्या दृष्टीकोणातून तयार करत आहे. त्यामुळे या संघात युवा खेळाडूंना जास्तीजास्त संधी देण्यात येत आहे. त्यामुळे कार्तिक टीम इंडियाच्या रणनितीत नसल्याचेच दिसून येते.

जरी दिनेश कार्तिकची टीम इंडियातील इनिंग संपली असली तरी त्याने कॉमेंट्री बॉक्समधील आपली दुसरी इनिंग झोकात सुरू केली आहे. आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळत असला तरी कार्तिक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत माईक हातात घेतला.

Dinesh Karthik MS Dhoni Commentary
Rohit Sharma IND vs AUS : पाकिस्तानातील लोकं म्हणत होती म्हणून... रोहितने दिलं भन्नाट उत्तर

दिनेश कार्तिक आपल्या समोलचक म्हणून सुरू केलेल्या नव्या कारकिर्दीविषयी म्हणतो, 'माझ्या समालोचनाची छोटी कारकीर्द मी खूप एन्जॉय करतोय. मी खेळाबद्दल बोलण्याचा आनंद घेतोय. मी याच्याकडे खूप विश्लेषणात्मक पद्धतीने पाहतोय. याचबरोबर जे खेळ पाहत आहेत त्यांना काहीतरी अर्थपूर्ण मिळेल याचा देखील प्रयत्न करतोय.'

आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये कार्तिक म्हणतो, 'तुम्हाला माहिती आहेच की मी प्रत्येक परिस्थितीचे माझ्या पद्धतीने विश्लेषण करतो. माझ्या मनात सामन्यातील परिस्थितीविषयी काय येते ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो.'

कार्तिक पुढे म्हणाला की, 'विशेष म्हणजे मला अशा व्यक्तीकडून शाबासकी मिळाली आहे ज्याची आजीबात अपेक्षा नव्हती. ती माझी सर्वात मोठी शाबासकी आहे. तो व्यक्ती आहे महेंद्रसिंह धोनी. त्याने माला कॉल केला आणि म्हणाला मी तुझी कॉमेंट्री खरोखर खूप एन्जॉय करतो. खूप छान. वेल डन!'

Dinesh Karthik MS Dhoni Commentary
Credit Card Fraud : बनावट क्रेडीट कार्डच्या सहाय्याने सचिन तेंडुलकरसह ९५ सेलिब्रेटींचा सिबिल स्कोर केला खराब; आरोपी...

'धोनीच्या शाबासकीनंतर माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी त्याचे आभापर मानले. हे खूप मोठं आहे. सहाजिकच तो सामने पाहतोय. त्याच्याकडूनच कौतुकाचे दोन शब्द ऐकणे खूप चांगले आहे. मी खूप आनंदी आहे आणि माझी कॉमेंट्री मी एन्जॉय करतोय.'

दिनेश कार्तिकसाठी गेला आयपीएल हंगाम चांगला गेला होता. त्याने आरसीबीकडून खेळताना 183 च्या दमदार स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात मॅच फिनिशर म्हणून जागा मिळवली होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.