Dinesh Karthik | VIDEO : दिनेश कार्तिकने अश्विनचे मानले आभार; म्हणाला काल...
Dinesh Karthik : भारताने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमधील सुपर 12 मध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात दिली. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भारताला एका चेंडूत एका धावाचे गरज होती त्यावेळी मिड ऑफच्या वरून चौकार मारत सामना जिंकून दिला. ज्यावेळी भारताला 2 चेंडूत दोन धावांची गरज होती त्यावेळी दिनेश कार्तिक रन आऊट झाला होता.
भारताला पाकिस्तानविरूद्ध विजयासाठी 2 चेंडूत 2 धावांची गरज होती त्यावेळी दिनेश कार्तिक रन आऊट झाला होता. त्यामुळे सामना 1 चेंडू आणि 2 धावा असा आला होता. क्रीजवर अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन आला होता. 53 चेंडूत 82 धावा केलेला विराट कोहली नॉन स्ट्राईकवर उभारून हा सगळा ड्रामा पाहत होता. दरम्यान, मोहम्मद नवाझने अश्विनच्या पायाच्या दिशेने चेंडू टाकला. मात्र अश्विन आत शफल झाला आणि तो चेंडू पंचांनी वाईड ठरवला. त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या 159 धावांशी बरोबरी साधली. त्यानंतर अश्विनने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकून दिला.
सामना झाल्यानंतर भारतीय संघ या विजयाचे फारसे सेलिब्रेशन न करता आपल्या पुढच्या मोहिमेसाठी सिडनीत दाखल झाला. मात्र पाकिस्तानच्या थरारक विजयाचा हँगओव्हर अजूनही होताच. याचवेळी बीसीसीआयच्या एका व्हिडिओत दिनेश कार्तिकने आर. अश्विनचे आभार मानले. दिनेश कार्तिक व्हिडिओत म्हणाला की, 'काल मला वाचवल्याबद्दल तुझे आभार अश्विन. यावर अश्विन देखील हसताना दिसतोय. जर भारताने सामना गमावला असता तर सर्वाधिक टीका ही दिनेश कार्तिकवर झाली असती. कारण दिनेश कार्तिकने मॅच फिनिशर म्हणून भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
या व्हिडिओत दिनेश कार्तिक आणि अश्विन यांच्याव्यतिरिक्त हार्दिक पांड्या आणि विराट कोहली देखील संघाच्या बसमधून उतरताना दिसत आहेत. पांड्याने आपला मुलगा अगस्तला कडेवर घेतले होते. त्याच्यासोबत त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच देखील होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.