Duleep Trophy 2023 : विजय तब्बल 511 धावांचा! नॉर्थ इस्ट झोनविरूद्ध 'उत्तर दिग्विजय'

Duleep Trophy 2023
Duleep Trophy 2023 esakal
Updated on

Duleep Trophy 2023 : दुलीप ट्रॉफी 2023 च्या दोन्ही क्वार्टर फायनलचा निकाल लागला आहे. आज नॉर्थ झोनने नॉर्थ इस्ट झोनचा तब्बल 511 धावांनी पारभव करत सेमी फायनल गाठली. तर पहिल्या क्वार्टर फायनल सामन्यात सेंट्रल झोनने ईस्ट झोनचा 170 धावांनी पराभव केला.

Duleep Trophy 2023
Cheteshwar Pujara : पुजाराला डच्चू देणं हे सकारात्मक पाऊल... माजी प्रशिक्षकांचे सडेतोड वक्तव्य

नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट झोनच्या सामन्यात नॉर्थ ईस्टसमोर विजयासाठी 666 धावांचे आव्हान होते. मात्र नॉर्थ ईस्ट झोनला 154 धावाच करता आल्या. नॉर्थ झोन कडून दुसऱ्या डावात पुलकित नारंगने दमदार गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात देखील 3 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने 13.5 षटकात 43 धावा देत 4 विक्टेस घेतल्या. पलकित सोबतच निशांतने 2 तर हर्षित आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Duleep Trophy 2023
Ireland Series : आयर्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

नॉर्थ झोनने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 8 बाद 540 धावा केल्या. नॉर्थ झोनने आपला पहिला डाव घोषित केला. याच्या प्रत्युत्तरात नॉर्थ ईस्ट झोनचा पहिला डाव 134 धावातच संपुष्टात आला. पहिल्या डावात 406 धावांची दणदणीत आघाडी घेतल्यानंतर नॉर्थ झोन दुसरा डाव 6 बाद 259 धावांवर घोषित केला. नॉर्थ ईस्ट झोनसमोर 666 धावांचे आव्हान ठेवले.

(Sports Latest News)

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या उत्तर विभागाने 540/8 धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात उत्तर पूर्व विभागाला त्यांच्या डावात 39.2 षटकांत केवळ 134 धावा करता आल्या. पहिल्या डावाच्या जोरावर उत्तर विभागाला 406 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात उत्तर विभागाने 259/6 धावा केल्या, ईशान्य विभागासाठी 666 धावांचे लक्ष्य ठेवले.

या सामन्यात उत्तर विभागाची फलंदाजी तसेच गोलंदाजी उत्कृष्ट होती. ऑफस्पिनर पुलकित नारंग हा स्टार गोलंदाज होता. त्याने पहिल्या डावात 3 बळी घेतले. पुलकितशिवाय सिद्धार्थ कौलनेही पहिल्या डावात 3 बळी घेतले. पुलकितने दुसऱ्या डावात 4 खेळाडू बाद केले, तर सिद्धार्थला दुसऱ्या डावात एकही बळी घेता आला नाही.

उत्तर विभागाकडून पहिल्या डावात ध्रुवने 135 आणि निशांत सिंधूने 150 धावा केल्या. पहिल्या डावात 122 धावा केल्यानंतर हर्षित राणाही नाबाद राहिला. उत्तर विभागाच्या दुसऱ्या डावात प्रभसिमरन सिंग (59) आणि अंकित कुमार (70) यांनी अर्धशतके झळकावली. जयंत यादवही 55 धावा करून नाबाद राहिला. अंकित कलसीनेही दुसऱ्या डावात 49 धावांचे योगदान दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.