यशस्वी जैस्वालची संघात निवड, CSK च्या स्टार खेळाडूलाही मिळाली जागा!

 duleep trophy 2023 yashasvi jaiswal selected-in-squad-with ruturaj gaikwad-for-west-zone
duleep trophy 2023 yashasvi jaiswal selected-in-squad-with ruturaj gaikwad-for-west-zone sakal
Updated on

आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल या दोन्ही सलामीवीरांची २८ जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप क्रिकेट करंडकासाठी पश्‍चिम विभागीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जात असून १२ जुलैपासून डॉमिनिका येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. दोन देशांमधील दुसरी कसोटी २० ते २४ जुलैदरम्यान पार पडेल. दुलीप ट्रॉफीचा कालावधी २८ जून ते १६ जुलै असा असणार आहे. ऋतुराज व यशस्वी या दोघांचीही पश्‍चिम विभागीय संघात निवड केल्यामुळे आता त्यांची भारताच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्यता दिसत नाही.

 duleep trophy 2023 yashasvi jaiswal selected-in-squad-with ruturaj gaikwad-for-west-zone
The Ashes Series 2023: ॲशेस मालिकेचा थरार आजपासून; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलमध्ये सुमार फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉ व सर्फराझ खान या मुंबईकरांना मात्र संधी देण्यात आली आहे. दोघांचीही पश्‍चिम विभागीय संघात वर्णी लागली आहे. मुंबईच्या शम्स मुलानी यालाही निवडण्यात आले आहे. प्रियांक पांचाल याच्याकडे पश्‍चिम विभागाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

तुषार, केदार राखीव खेळाडूंत

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने आयपीएलच्या मोसमात २१ विकेट घेत आपला ठसा उमटवला; मात्र त्याच्यासह महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज केदार जाधव याला राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आल आहे.

 duleep trophy 2023 yashasvi jaiswal selected-in-squad-with ruturaj gaikwad-for-west-zone
Ishan Kishan : सिलेक्टर करणार होते कर्णधार, खेळण्यास दिला नकार आता इंडिजविरुद्धच्या मालिकेतूनही जाणार बाहेर?

पश्‍चिम विभागाचा संघ ः यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, प्रियांक पांचाल (कर्णधार), हार्विक देसाई (यष्टिरक्षक), पृथ्वी शॉ, हित पटेल, सर्फराझ खान, अर्पित वसावडा, अतित सेठ, शम्स मुलानी, युवराज दोदिया, धर्मेंद्र जडेजा, चेतन सकारिया, चिंतन गझा, अर्झान नागवासवल्ला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.