Dunith Wellalage : आधी प्रिन्स नंतर किंग, वेल्लालागे हिटमॅनचीही शिकार करत बनला हिरो

Dunith Wellalage
Dunith Wellalage esakal
Updated on

Dunith Wellalage India Vs Sri Lanka : भारताने आशिया कप 2023 मधील आपल्या दुसऱ्या सुपर 4 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी ज्या प्रकारे सुरूवात केली ते पाहता. पाकिस्तान प्रमाणे श्रीलंकेविरूद्ध देखील भारतीय संघ धावांचा मोठा डोंगर उभारणार असे वाटत होते. मात्र भारताच्या मनसुब्यांना 20 वर्षाच्या दुनिथ वेल्लालागेने सुरूंग लावला. (India Vs Sri Lanka)

Dunith Wellalage
IND Vs SL : वेल्लालागेने अष्टपैलू कामगिरी करत भारताला दिली झुंज; अखेर कुलदीपने संपवला सामना

रोहित आणि शुभमन यांनी 11 षटकात 80 धावा ठोकत याची संकेत देखील दिले. मात्र श्रीलंकेच्या 20 वर्षाचा डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने आपल्या पहिल्याच चेंडूवर प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट शुभमन गिलची दांडी गुल करत भारताला पहिला धक्का दिला. (Asia Cup 2023)

यानंतर आपल्या दुसऱ्याच षटकात त्याने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात 96 चेंडूत 122 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या विराट कोहलीला देखील अवघ्या 3 धावांवर पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. विराट बाद झाल्यानंतर सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा रोहित नाराज झाला होता.

Dunith Wellalage
Rohit Sharma : शर्माजी का बेटा 10 हजारी मनसबदार! षटकार मारला अन् आला सचिन, गांगुलीच्या पंक्तीत

मात्र रोहित शर्माला या 20 वर्षाच्या डावखुऱ्या फिरकीपटूने त्याच्या तिसऱ्या षटकात मोठा धक्का दिला. त्याने रोहित शर्माचा 53 धावांवर त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला. गेल्या वर्षी 19 वर्षाखालील वर्ल्डकप खेळलेल्या या दुनिथने तीन षटकात तीन विकेट घेत भारताची तगडी टॉप ऑर्डर लिलया उडवली.

दुनिथच्या फिरकीमुळे 11 षटकात बिनबाद 80 धावा करणाऱ्या भारताची अवस्था 3 बाद 91 अशी झाली. यानंतर इशान किशन आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत भारताचे शतक धावफलकावर लावले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.