Durand Cup 2021 : भारतीय फुटबॉल हंगामाचा नारळ फुटणार!

आशियातील सर्वात जुनी आणि जागतिक फुटबॉलमधील तिसऱ्य़ा क्रमांकाची ड्युरँड फुटबॉल स्पर्धेला रविवारपासून कोलकाताच्या मैदानातून प्रारंभ होत आहे.
The Durand Football Tournament
The Durand Football Tournament E Sakal
Updated on

The Durand Football Tournament : आशियातील सर्वात जुनी आणि जागतिक फुटबॉलमधील तिसऱ्य़ा क्रमांकाची ड्युरँड फुटबॉल स्पर्धेला रविवारपासून कोलकाताच्या मैदानातून प्रारंभ होत आहे. सोळा संघात रंगणाऱ्या या स्पर्धेने भारतीय फुटबॉल हंगामाचा नारळ फुटणार आहे. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत बिग बजेट इंडियन सुपर लिग (आयएसएल) आणि इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) संघातील दर्जाचा फैसलाच जणू या स्पर्धेतून होणार आहे. त्यामुळे तमाम फुटबॉल क्षेत्राचे याकडे लक्ष लागून आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद पटकावून हुकमुत राखणारा मोहन बागान हाच फेव्हरिट मानला जातो आहे.

आशियाई क्लब चँम्पियनशिप स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणारा एफसी गोवा, बंगळूरु एफसी, हैद्राबाद एफसीसह गतवेळेचा विजेता गोकुलुम एफसी यांच्या कामगिरीची उत्कंठाही चाहत्यांना नक्कीच असेल.

1988 मध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची मुहुर्तमेढ हिमाचल प्रदेशातील सिमल्यात रोवली गेली. इग्रंजाचे सचिव क्रीडाप्रेमी मार्टिनेझ ड्युरँड यांच्या नावाने ही स्पर्धा ओळखली जाऊ लागली. सुरवातीला केवळ लष्करी संघापुरती मर्यादित असल्याने याच संघाचे वर्चस्व राहिले. त्यानंतर 1940 ही स्पर्धा दिल्लीला स्थलातंरीत झाली आणि सर्व संघासाठी खुलीही झाली.

The Durand Football Tournament
IND vs ENG Day 3 : पिछाडीवरुन टीम इंडियाची पुन्हा एकदा आघाडी

साहजिकच तेव्हापासून या स्पर्धेवर भारतीय फुटबॉवर वरचष्मा असणाऱ्या कोलकत्याच्या संघानी दबदबा निर्माण केला. बिग ब्रदर मोहन बागान आणि ईस्ट बंगाल संघानी या स्पर्धेचे प्रत्येकी 16 वेळा सर्वाधिक विजेतेपद पटकावून दरारा निर्माण केला आहे. सध्या भारतीय लष्करातर्फे या स्पर्धेचे संयोजन केले जाते. दुसरे महायुध्द (सन 1939-1949) आणि गतवर्षी कोरोनामुळे ही ऐतिहासिक स्पर्धा खंडीत झाली. अलिकडे आएएसएल आणि आयलिग स्पर्धेच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या स्पर्धेचे महत्व कमी झाले. पात्रता स्पर्धेतून येणाऱ्या संघाना अव्वल संघाशी दोन हात करण्याची संधी या स्पर्धेत मिळते.

The Durand Football Tournament
VIDEO : हिटमॅननं तोऱ्यात साजरी केली परदेशातील पहिली सेंच्युरी!

यंदा या स्पर्धेत आयएसएलचे पाच, आय़ लिग प्रथम श्रेणीचे तीन, द्वितीय श्रेणीचे दोन आणि भारतीय लष्कराचे सहा असे एकुण सोळा संघ उतरणार आहेत.  प्रत्येकी चार संघाचे चार गट असुन प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. अ गटात कोलकत्याचा मोहामेडन आणि बंगलुरचा युनायटेडचे पारडे जड असुन इंडियन एअर फोर्स आणि पंजाबचा सीआऱपीफ कसे लढणार याची उत्सकुता आहे. ब गटात एफसी गोवा आणि जमशेदपुर एफसी वरचढ असुन गतवर्षी आय़लीग

मध्ये दिल्लीचा सुदेवा एफसी आर्मी ग्रीन संघाची कसोटी आहे. क गटात बंगळुरु एफसी, केरला ब्लास्टर्स इंडियन नेव्ही, नवखा दिल्ली एफसीवर कब्जा मिळवतील अशी अपेक्षा आहे. ड गटात हैदाब्राद एफसी आणि केरळचा गोकुलुम दावेदार असुन आसाम रायफल्स, आर्मी रेड संघाची अग्नी परीक्षा आहे.

बिग बजेट आयएसएल कि भारतीय फुटबॉलला नवसंजीवनी देणारी आय लिग स्पर्धा श्रेष्ठ हा वाद नेहमीच रंगतो. यास्पर्धेच्या निमिताने कुणाचा दर्जा सर्वश्रेष्ठ याचा फैसला होईल अशी आशा चाहत्यांत आहे. दोन महिन्यानंतर आयएसएल आणि आयलिग स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच संघानी जोरदार संघबांधणी केली आहे. त्याची चाचणीच या स्पर्धेच्या निमिताने होईल. प्रशिक्षक अँन्थोनी ह्ब्बास यांच्या मोहन बागानने एएफसी स्पर्धेची बाद फेरी गाठून हंगामाचा धडाक्यात प्रारंभ केला आहे. गोवा एफसीने आशियाई क्लब चँम्पियनशिप स्पर्धेत परदेशी संघाना हैराण करून प्रभाव पाडला आहे. बंगळुरु संघाची एएफसीची बादफेरी थोडक्यात हुकली असल्याने हा संघही प्रबळ आहे. या संघाविरूध्द आय लिग संघाचा कस लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.