दुर्गा मूर्तीची तोडफोड; पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश म्हणाला...

मुकेश पत्नीसह नारायण मंदिरात प्रार्थनेसाठी गेला होता. येथे त्याने एका तरुणाला हातोड्याने मूर्ती नष्ट करताना बघितले
Danish Kaneria
Danish KaneriaDanish Kaneria
Updated on

पाकिस्तान : पाकिस्तानमध्ये (pakistan) दररोज मंदिरांचे (Demolition of the idol) नुकसान होत आहे. हिंदूंवरील हल्ल्याच्या बातम्या रोज समोर येत असतात. नुकतेच कराचीमध्येही एका मंदिराला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू दानिशने (Danish Kaneria) एक व्हिडिओ पोस्ट करून हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कु वरील पोस्टमध्ये त्याने लिहिले, कराचीच्या मध्यभागी असलेल्या मंदिरावर हल्ला (Demolition of the idol) झाला आहे. धार्मिक स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ नये. यामुळे पाकिस्तानची बदनामी होत आहे. मी पंतप्रधान इम्रान खान यांना कारवाई करण्याची विनंती करतो. कराचीच्या जुन्या शहरातील नारायणपुरा भागात सोमवारी रात्री नारायण मंदिरात ठेवलेल्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती.

Danish Kaneria
ST Workers Death : ‘दुखवटा हा अनिश्चित काळासाठी असू शकत नाही’

मोहम्मद वालीद शब्बीर असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी सरफराज नवाज यांनी सांगितले की, शब्बीरला मूर्तींची हानी केल्याप्रकरणी (Demolition of the idol) अटक करण्यात आली आहे. मुकेश कुमार या हिंदू तरुणाच्या तक्रारीनंतर त्याला अटक केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश पत्नीसह नारायण मंदिरात प्रार्थनेसाठी गेला होता. येथे त्याने एका तरुणाला हातोड्याने मूर्ती नष्ट करताना बघितले.

हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी

मंदिरात उपस्थित असलेल्या संतप्त हिंदूंनी शब्बीरला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यानंतर परिसरात राहणाऱ्या हिंदूंनीही पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करीत हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली. या घटनेनंतर त्यांना या भागात असुरक्षित वाटत असल्याचेही लोकांनी सांगितले.

Danish Kaneria
शाळेत मुलाने लिहिलेले वाक्य पाहून शिक्षिकेला बसला धक्का

सोमवार रात्रीची घटना

सोमवारी रात्री कराचीच्या (Karachi) नारायणपुरा भागातील रणछोर लेनमधील दुर्गा मंदिरात (Durga Temple) मूर्तींची तोडफोड झाल्याची घटना घडली होती. स्थानिक हिंदू समाजातील (Hindu Community) नागरिकांनी ईदगाह पोलिस ठाण्याबाहेर (Idgah Police Station) निदर्शने करायला सुरुवात केली होती. या घटनेत सहभागी असलेल्या दोन जणांपैकी एकाला जागीच पकडण्यात आले. मात्र, दुसरा तिथून पळून गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.