Cricket News : 8 महिन्यांनंतर या खेळाडूची टी-20 संघात एंन्ट्री! निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय

टी-20 मालिकेसाठी दिग्गज खेळडूने 8 महिन्यांनंतर संघात केले पुनरागमन...
Bangladesh T20 Squad
Bangladesh T20 Squad
Updated on

Bangladesh T20 Squad : बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी 546 धावांनी जिंकली. आता बांगलादेश संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर एका स्टार खेळाडूचे 8 महिन्यांनंतर संघात पुनरागमन झाले आहे. हा खेळाडू गोलंदाजीत माहिर आहे.

Bangladesh T20 Squad
AUS vs ENG Moeen Ali: अ‍ॅशेस कसोटी सामन्यादरम्यान मोईन अलीला मोठा झटका! ICC ने घेतली मोठी ॲक्शन

या गोलंदाजाचे पुनरागमन

बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन टी-20 मालिकेसाठी इबादत हुसेन आणि फलंदाज अफिक हुसेन यांना मुख्य संघात परत आले आहे. सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 14 आणि 16 जुलै रोजी टी-20 सामने खेळले जाणार आहेत. इबादत हुसेनने 14 नोव्हेंबर 2022 रोजी बांगलादेश संघासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला. आता 8 महिन्यांनंतर तो परत येत आहे. इबादतने बांगलादेशसाठी 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही भाग घेतला होता.

Bangladesh T20 Squad
WI vs IND : WTC पराभवानंतर पुजाराने घेतला मोठा निर्णय! वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर सोडणार टीम इंडियाची साथ

टी-20 मालिकेव्यतिरिक्त स्टार फलंदाज अफिक हुसैनची वनडे मालिकेसाठीही निवड करण्यात आली आहे. अफिकने मार्च 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्याने 62 टी-20 सामन्यांमध्ये 120.28 च्या स्ट्राइक रेटने 1020 धावा केल्या आहेत. तो एक असा खेळाडू आहे जो स्फोटक फलंदाजीत माहिर आहे.

बांगलादेशचे मुख्य निवडकर्ता मिहाजुल अबेदिन यांनी सांगितले की, आम्ही पाच वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. हे आम्हाला गोलंदाजांना फिरवण्यास मदत करेल. त्यामुळे इबादत हुसेनला संघात स्थान मिळाले आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश टी-20 संघ :

शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, रॉनी तालुकदार, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदया, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद, इबादत हुसेन चौधरी, शोरफुल होसेन, रिफ्फुल इस्लाम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.