ऑरेगॉन : जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (World Athletics Championship) ट्रिपल जंप (Triple Jump) प्रकारात भारताचा एल्डहोसे पॉल (Eldhose Paul) अंतिम फेरीत 9 व्या स्थानावर राहिला. त्याला फायनलच्या टॉप 8 मध्ये स्थान मिळवता आले नाही. त्याने 16.79 मीटर लांब उडी मारली. पॉल हा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ट्रिपल जंप प्रकारात फायनलमध्ये पोहचणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
एल्डहोसे पॉल पहिल्या दोन प्रयत्नात 16.37 मीटर उडी मारत पदकाच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर त्याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारत 16.79 मीटर उडी मारली. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्याने 13.86 मीटर उडी मारली. पॉल पहिल्या तीन उडींच्या आधारे पहिल्या आठ जणांच्या यादीत येण्यापासून थोडक्यात चुकला. तो 19.79 मीटर उडीच्या आधारे यादीत नवव्या स्थानावर राहिला.
पॉल हा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंप प्रकारात फायनलमध्ये पोहचणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याची वैयक्तिक सर्वोकृष्ट कामगिरी ही 16.99 मीटर इतकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.