Emerging Asia Cup 2023 Final : नुकत्याच झालेल्या इमर्जिंग आशिया कप फायनल स्पर्धेत भारत अ संघाचा पाकिस्तान अ संघाने पराभव केला. भारत या स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र तुलनेने अनुभवी संघ असलेल्या पाकिस्तानने भारतावर 128 धावांनी शानदार विजय मिळवला.
मात्र सामना झाल्यापासून दोन्ही संघातील खेळाडूंच्या अनुभवावरून वक्तव्य केली जात आहेत. यावर आता पाकिस्तान अ संघाचा कर्णधार मोहम्मद हारिसने आपले मत व्यक्त केले. त्याने भारताने आपला ज्युनियर संघ पाठवला होता असे बोलणाऱ्यांना चपराक लगावली. (India A Vs Pakistan A)
अनेक क्रिकेट समिक्षक हे पाकिस्तानने इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू पाठवणे योग्य नव्हते असे मत व्यक्त केले होते. इमर्जिंग आशिया कप हा युवा खेळाडूंसाठी आहे. मात्र पाकिस्तानचा कर्णधार हारिसने वेगळं मत व्यक्त केलं. त्याने पाकिस्तानी खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाची तुलना ही भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या आयपीएलमधील अनुभवाशी केली. (India Vs Pakistan Controversy News)
मोहम्मद हारिसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोहम्मद हारिस म्हणतो की, 'ज्या प्रकारे लोकं आम्ही मोठ्या खेळाडूंचा संघ घेऊन गेलो होतो असं बोलत आहेत. आम्ही छोटी मुलं होतो असं ते म्हणत आहेत. आम्ही त्यांना सांगितलं नव्हत की छोट्या मुलांना घेऊन या. ते म्हणतात की तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले खेळाडू होते.'
'आमच्याकडे किती आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव होता. सौमकडे 5 माझ्याकडे 6 सामन्यांचा होता. हे सर्व टी 20 सामने होते. यांच्या संघातील खेळाडूंकडे 260 आयपीएल सामन्यांचा अनुभव होता.'
हारिस म्हणाला की पाकिस्तान संघाने भारताला त्यांचा ज्युनियर संघ घेऊन येण्यास सांगितलं नव्हतं असं मुजोर उत्तर देखील दिलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.