नाईटक्लब बाहेर फुटबॉलरवर हल्ला, पोलिसांनी गोळीबार करून वाचवले प्राण

पोलिसात आणि चोरामध्ये 29 वेळा फायरिंग
Emerson Royal Attacked
Emerson Royal Attackedsakal
Updated on

Emerson Royal Attacked: ब्राझीलच्या सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी इमर्सन रॉयल हा खेळाडूं एका मोठ्या संकटातून वाचला आहे. दरोड्याच्या उद्देशाने त्याच्यावर मोठं संकट आलं होतं. पण सुदैवाने इमर्सन रॉयल सुखरूप बचावला. एका पोलिस कर्मचाऱ्याने अत्यंत नाट्यमय पद्धतीने इमर्सनवरील हल्ला परतवला. ब्राझीलमधील नाईट क्लबच्या बाहेर तो पोलिस कर्मचारी इमर्सन बर फोटो काढत होता. तेव्हा त्यांच्यावर एक दरोडेखोरने हल्ला केला. इमर्सनला बंदूक दाखवत त्याच्याकडील पैसे मागितले. त्याठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने इमर्सनला वाचवले.

Emerson Royal Attacked
ब्रेंडन मॅक्युलमची इंग्लंडवर जादू; स्लिपमध्ये 1-2 नव्हे 6 क्षेत्ररक्षक

सुत्रांच्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्याने आणि हल्लेखोरामध्ये गोळीबार झाला. यादरम्यान फुटबॉलपटू इमर्सन रॉयलला कोणत्याही प्रकारचे हानी झाली नाही. हल्लेखोराला पोलीस अधिकाऱ्याने पकडले आहे. त्यानतंर इमर्सनने इंस्टाग्राम पोस्टमध्ये करत लिहिले की, मी तुमचा सदैव ऋणी राहीन, देव या भूमीवर देवदूत पाठवतो याचा पुरावा मला माझ्या आयुष्यात मिळाला आहे. माझा जीव वाचवण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याने आपला जीव धोक्यात घातला.

Emerson Royal Attacked
सचिन तेंडूलकरने लहानग्या अनयला स्वाक्षरीसह पाठवले पत्र

पोलिसात आणि चोरामध्ये 29 वेळा फायरिंग झाली. दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा जीव धोक्याबाहेर आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री तीन वाजता हि घटना घडली. तेव्हा इमर्सन रॉयल नाईट क्लबमधून बाहेर पडला आणि यांच्या सोबत हा अपघात झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()