Eng vs Aus Test : क्रिकेटमधील सद्‍भावना कधीच लोप पावली! क्रिकेटच्या पंढरीत झालेल्या कृत्यावर दिग्गजाची नाराजी

बेअरस्टोच्या रनआऊटवरून क्रिकेटविश्वात खळबळ! किवी दिग्गजानंही कांगारूना सुनावलं
Eng vs Aus Test
Eng vs Aus Test
Updated on

क्रिकेट या खेळातील सद्‍भावन कधीच लोप पावली आहे. अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टॉ याला धावचीत करताना क्रिकेटमधील सभ्यता गुंडाळण्यात आली, असे मत न्यूझीलंडचे माजी यष्टिरक्षक फलंदाज इयन स्मिथ यांनी व्यक्त केले.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस् मैदानावर रविवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी खिलाडूवृत्तीची ऐशीतैशी करण्यात आली. बेअरस्टॉ १० धावांवर खेळत होता, त्या वेळी ५२ व्या षटकात इंग्लंडने ५ बाद १९३ धावा केल्या होत्या. कॅमेरून ग्रीनचा आखूड टप्प्याचा चेंडू बेअरस्टॉने खाली वाकून सोडून दिला.

Eng vs Aus Test
Team India Coach : टीम इंडियाला मिळणार नवीन कोच, 'या' दौऱ्यापासून होणार नियुक्ती

बेअरस्टॉ पाय क्रीजमध्ये टॅप करून पुढे गेला (धाव घेण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता) त्याच वेळी यष्टिरक्षक अॅलेक्स केरीने चेंडू हातात येतात लगेचच यष्टींवर अंडरआर्म थ्रो केला आणि बेअरस्टॉला धावचीत केले. नियमानुसार बेअरस्टॉला तिसऱ्या पंचांनी धावचीत ठरवले, परंतु ऑस्ट्रेलियावर अखिलाडूवृत्तीवरून टीका करण्यात आली. अखेर इंग्लंडने हा सामना ४३ धावांनी गमावला.

चेंडू यष्टींच्या मागे गेल्यावर बेअरस्टॉने पाठीमागे यष्टिरक्षक केरीकडे पाहिले नाही. चेंडू त्याच्या ग्लोव्हजमध्ये गेला आहे की नाही याकडेही त्याने कटाक्ष टाकला नाही. केरीने याचा फायदा घेऊन यष्टींवर चेंडू मारला. खरे तर या संधीचा ऑस्ट्रेलियाने फायदा घेतला, असे स्मिथ यांनी म्हटले आहे.

Eng vs Aus Test
Team India : BCCIने 'या' दिग्गज खेळाडूला अचानक केलं उपकर्णधार, मात्र कारकीर्दीला मोठा धोका

चेंडू यष्टींच्या मागे गेला म्हणजे तो ‘डेड’ झाला, असा समज झाल्याने बेअरस्टॉ क्रीजच्या पुढे आला. तिसऱ्या पंचांनी बेअरस्टॉला धावचीत ठरवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोष सुरू केला, परंतु प्रेक्षकांनी मात्र त्यांच्या अखिलाडूवृत्तीची खिल्ली उडवली आणि घोषणाबाजीही सुरू केली.

या सर्व प्रकारात खिलाडूवृत्ती होतीच कोठे, नव्हतीच मुळात, त्यामुळे सध्याचे क्रिकेट खिलावृत्तीने खेळले जात आहे की नाही हा पश्न उपस्थित होतो. सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख होती ती आता पुसली जात आहे, अशीही खंत स्मिथ यांनी व्यक्त केली.

स्मिथ यांनी चौथ्या दिवशी इंग्लंड फलंदाज बेन डकेट याचा झेल मिचेल स्टार्कने पकडण्यावरून आणि त्याने केलेल्या अपीलवरूनही निराशा व्यक्त केली. स्टार्कने झेल पकडला खरा, परंतु त्याच ओघात चेंडू त्याने जमिनीवर घासत नेला. मैदानावरील पंचांनी त्याला बादही ठरवले होते, परंतु तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून डकेटला नाबाद ठरवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.