ENG vs IND: खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीची जडेजाने केली पाठराखण

विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिल्यास टी-20 विश्वचषक पाहता निवड समिती काय निर्णय घेणार
T20 Out Of Form Virat Kohli
T20 Out Of Form Virat Kohlisakal
Updated on

India Vs England T20 Series: टीम इंडियाने गेल्या आठवड्यात एजबॅस्टन येथे इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 49 धावाने पराभव केला. या विजयासह भारताने 3 टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मात्र दुसऱ्या टी-20 मध्येही माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिला आणि तो केवळ एक धाव घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. (T20 Out Of Form Virat Kohli)

T20 Out Of Form Virat Kohli
'स्विंगमास्टर' भुवीने रचला मोठा इतिहास; 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

कोहलीचा फ्लॉप शो बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. विराट कोहली फ्लॉप झाल्यावर चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. पण भारताचा माजी दिग्गज अजय जडेजा मात्र विराट कोहलीच्या बाजूने उभा आहे. विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 76 डावांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. मात्र केवळ त्याने शतक न त्याला वगळता येणार नाही, असे जडेजाने सांगितले.

जडेजा पुढे म्हणाला, जर तुम्ही आकड्यांवर नजर टाकली तर तुम्हाला असे वाटते की विराट कोहलीने गेल्या 8 किंवा 10 सामन्यांमध्ये शतक केले नाही. पण विराट कोहलीला केवळ शतक झळकावता न आल्याने तुम्ही त्याला बाहेर नाही काढू शकत. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीबाबत खूप प्रश्न निर्माण होत आहे. विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम राहिल्यास टी-20 विश्वचषक पाहता निवड समिती मोठा निर्णय घेऊ शकतात.

T20 Out Of Form Virat Kohli
Eng Vs Ind: शतकवीर दीपक हुड्डा सोडून फ्लॉप विराट कोहलीला संधी; अन् फक्त एक...

दुसऱ्या टी-20 बद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जडेजाच्या 46 धावांच्या खेळीमुळे भारताने 20 षटकात 8 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश फलंदाज भुवनेश्वर कुमारच्या घातक गोलंदाजीपुढे टिकू शकले नाहीत. संपूर्ण संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 आणि डेव्हिड विलीने 33 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.