Eng vs Ind: रोहित शर्माचे 11 वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल 'मुंबईचा सूर्या...'

सूर्यकुमारबद्दल रोहित शर्माची भविष्यवाणी ठरली खरी
Rohit Sharma Tweet Viral
Rohit Sharma Tweet Viralsakal
Updated on

Rohit Sharma Tweet Viral: टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रूपाने असा स्फोटक फलंदाज मिळाला आहे, जो मैदानात 360 डिग्री मध्ये कुठेही चौकार-षटकार मारू शकतो. सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 55 चेंडूत 117 धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 212.73 होता. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी सूर्यकुमार यादव फॉर्म मध्ये परत आला हे भारतासाठी मोठी बातमी आहे.(rohit sharma 11 year old tweet Viral social media suryakumar yadav)

Rohit Sharma Tweet Viral
आता सेहवागने सुद्धा केलं ट्विट, कोहलीसाठी वाजली धोक्याची 'घंटा'

नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सूर्याने आपल्या खेळीने भारतीय चाहत्यांची मनं जिंकले आहे. सूर्यकुमार यादवच्या टी-20 शतकानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माचे 10 वर्ष जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 डिसेंबर 2011 रोजी रोहितने ट्विट केले होते. ट्विट करताना रोहितने लिहिले होते, चेन्नईतील बीसीसीआय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. काही महान क्रिकेटपटू आले आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादवही भविष्यात चमत्कार करू शकतो.

Rohit Sharma Tweet Viral
विराट कोहलीवरून कपिल देव होतोय ट्रोल, उस्मान ख्वाजाने केली कमेंट

सूर्यकुमार यादव भारताकडून टी-20 मध्ये शतक करणार 5वा फलंदाज बनला आहे. सूर्यकुमारपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना आणि दीपक हुडा यांना ही कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये रोहित शर्माने 4 आणि केएल राहुलने 2 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी सुरेश रैना आणि हुड्डा यांनी प्रत्येकी शतक झळकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.