ऋषभ पंत सोबत युवराज सिंग 45 मिनिटं बोलला अन् इंग्रजांचे वाजवले बारा

IND vs ENG: युवराज सिंगच्या ट्विट इंटरनेटवर दहशत; ऋषभ पंतसोबत 45 मिनिट बोलला
yuvraj singh 45 minute conversation rishabh pant
yuvraj singh 45 minute conversation rishabh pantsakal
Updated on

Yuvraj Singh 45 Minute Conversation Rishabh Pant : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. पंतने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक केले. पहिलं शतक हे कोणत्याही फलंदाजासाठी खास असतं. पण, पंतची ही खेळी केवळ त्याच्यासाठीच नाही तर टीम इंडियासाठीही खास होती. पंतच्या नाबाद 125 धावांच्या जोरावर भारताने तिसरी वनडे 5 विकेटने जिंकली आणि इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. 8 वर्षांनंतर मायदेशात इंग्लंडला वनडे मालिकेत पराभूत करण्यात भारताला यश आले.

yuvraj singh 45 minute conversation rishabh pant
Eng vs Ind : सगळे शेर ढेर झाले असताना पंत-पांड्या इंग्रजांना भिडले

टीम इंडियाच्या मँचेस्टरमधील या विजयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. युवराज सिंगच्या ट्विटवरून कळत आहे की, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी तो ऋषभ पंतशी 45 मिनिट बोलला होता, त्यामुळे त्याचा फायदा मैदानात झाला. युवराज सिंगने ट्विट करत लिहिले की, 45 मिनिट बोलण्याचा फायदा झालेला दिसतोय! पंत चांगला खेळलास, अशाच गतीने खेळत राहा. पंड्या तुझी खेळी पाहून आनंद झाला.

yuvraj singh 45 minute conversation rishabh pant
IND vs WI : भारताविरूद्धच्या मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा; पूरन कॅप्टन

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी यजमानांना 259 धावांत ऑल आउट केले, पण लॉर्ड्सप्रमाणेच मँचेस्टरमध्येही पुन्हा एकदा भारताचे फलंदाज अपयशी ठरले. शिखर धवन 1 नंतर रोहित-कोहली 17-17 धावा करून बाद झाले, तर सूर्यकुमार यादवलाही 16 धावा करता आल्या. भारताने 72 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने ऋषभ पंतसह पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या तोंडातला घास हिरावून घेतला.

yuvraj singh 45 minute conversation rishabh pant
Hardik Pandya : पंत खेळलाच मात्र हार्दिक पांड्याने इतिहास रचला

हार्दिक 71 धावा करून बाद झाला, पण दुसऱ्या टोकाला असलेला पंत शतक ठोकण्याच्या मूडमध्ये होता. पंतने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक 106 चेंडूत पूर्ण केले. त्यानंतर भारतीय यष्टीरक्षकाने अधिक आक्रमक फॉर्म दाखवला. डेव्हिड विलीच्या एका षटकात 5 चौकार मारले, तर त्याने रूटच्या पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करून सामना आपल्या शैलीत संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.