Eng vs Nz: इंग्लंड सध्या न्यूझीलंड विरूद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा बेन स्टोक्सच्या खांद्यावर आली आहे तर मुख्य प्रशिक्षक म्हणून न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) काम पाहत आहे. सामन्यात पहिल्याच दिवशी 17 विकेट्स पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चांगलाच गोंधळ पाहिला मिळाला. चालू कसोटी सामन्याचे काही फोटो व्हायरल होत आहे. (Eng vs Nz Lords Test Slip Fielding Brendon Mccullum)
इंग्लंडने न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान 1-2 नव्हे तर 6 क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये होते. त्यामुळे त्याचे आक्रमक क्षेत्ररक्षण दिसून येते होते. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याला स्लिपमध्ये चार क्षेत्ररक्षक दिसतात. पण इंग्लंडच्या नव्या संघाकडे पाहता हा बदल स्पष्टपणे दिसून येतो. इंग्लंडच्या कसोटी संघाला नुकताच ब्रेंडन मॅक्युलम हा नवा कसोटी प्रशिक्षक मिळाला आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम त्याच्या कर्णधारपदाच्या काळातही आक्रमक क्षेत्ररक्षणसाठी ओळखला जात होता. मॅक्युलमने एकदिवसीय सामन्यांमध्ये 4-4 स्लिप फिल्डर्सचा वापरही अनेकदा केला आहे. आता मॅक्क्युलम इंग्लंड कसोटी संघाचा प्रशिक्षक असल्याने त्याचा परिणाम इंग्लंडच्या क्षेत्ररक्षणावरही दिसून येत आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 132 धावा करता आल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचीही अवस्था पण तशीच झाली. इंग्लंडला पहिल्या डावात केवळ 141 धावा करता आल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात चांगले प्रत्युत्तर दिले आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट गमावून 236 धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.