ENG-W vs IND-W 1st T20 : भारत आणि इंग्लंड महिला संघात नॉर्थहॅम्टनच्या मैदानातून टी-20 मालिकेला सुरुवात झाली. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघातील हरलीन देओल हिने सीमारेषेवर घेतलेल्या जबरदस्त कॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय इंग्लिश महिलांनी व्यर्थ ठरवला. नॅटली स्कायवर 55 (27) आणि अॅमी एलेन जोन्स 47 (27) तडाखेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लिश महिला संघाने 18 व्या षटकातच दिडशेचा पल्ला पार केला. (Eng W vs IND W 1st T20 Harleen Deol Takes Brilliant Catch On Boundary Edge To Dismiss Amy Ellen Jones Watch Video)
19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅमी एलेन जोन्सन बाद होऊन परतली. शिखा पांड्येच्या चेंडूवर तिने उत्तुंग फटका मारला. या फटक्यावर तिला सहा धावा मिळतील आणि ती अर्धशतक पूर्ण करेल, असे वाटत होते. पण सीमारेषेवर हरलीन देओलने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत तिला बाद केले. हरलीननं घेतलेला झेल क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता.
पुरुषांच्या सामन्यातच जबरदस्त कॅचेस पाहयला मिळत नाहीत तर महिला क्रिकेटही त्याला अपवाद नाही, असा सीनच हरलीन देओलने दाखवून दिला. राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन हरलीन देओलचा भन्नाट कॅच घेतलेला व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळताना दिसते.
200 धावांचा डोंगर रचण्यापासून वाचवले
शिखा पांड्येनं आपल्या स्पेलच्या अखेरच्या षटकात तीन विकेट घेतल्या. इंग्लंडच्या धावफलकावर 163 धावा असताना नॅटली स्कायवर कर्णधार हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद केले. त्यानंतर या षटकातील पाचव्या चेंडूवर सीमारेषेवर अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा दाखवून देत हरलीन देओलने तुफान फटकेबाजी करणाऱ्या अॅमी एलेन जोन्सनच्या खेळीला ब्रेक लावला. या षटकातील अखेरच्या चेंडूवर शिखाने अवघ्या 1 धावेवर सोफिया डंकलेला तंबूचा रस्ता दाखवला. रिचा घोषने यष्टीमागे चपळाई दाखवली. या तीन विकेटमुळे भारतीय महिलांना इंग्लंड महिला संघाला 200 च्या घरात जाण्यापासून रोखणं शक्य झालं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.