इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (३ सप्टेंबर) मोठी घोषणा केली आहे. इंग्लंडने वनडे आणि टी२० पुरुष संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे.
यापदासाठी गेल्या काही दिवसापासून भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची चर्चा होती. याशिवाय रिकी पाँटिंग, ओएन मॉर्गन यांचीही नावं चर्चेत होती. मात्र इंग्लंड बोर्डाने न्युझीलंडचा दिग्गज ब्रँडन मॅक्युलमकडेच कसोटीबरोबरच आता वनडे आणि टी२० संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सोपवली आहे.