AUS vs ENG : इंग्लंड - ऑस्ट्रेलिया सामना धुवून गेला तरी पॉईंट टेबलमध्ये झालेत मोठे बदल

England Australia Match Also abandoned Point Table Shakes Of Group 1
England Australia Match Also abandoned Point Table Shakes Of Group 1 ESAKAL
Updated on

Australia Vs England T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पावसाने चांगलाच खेळ मांडला आहे. मेलबर्नमध्ये आज दिवसभर तुफान पाऊस पडल्याने दोन्ही सामने पावसात वाहून गेले. पहिला अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आले. या सामन्यावेळी पडणारा पाऊस पाहूनच याच मैदानावर होणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर देखील काळे ढग दाटले होते. अखेर हा सामना देखील पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आले. मात्र वरूण राजाच्या या एक एक गुणांच्या खैरातीनंतर ग्रुप 1 मधील पॉईंट टेबलचे चित्र वरपासून खालपर्यंत क्षणार्धात बदलून गेले.

England Australia Match Also abandoned Point Table Shakes Of Group 1
Shoaib Akhtar : ...तर भारत पुढच्या आठवड्यात घर गाठणार; अख्तर बरळला!

आताच्या घडीला सुपर 12 फेरीतील ग्रुप 1 मधील न्यूझीलंड आणि श्रीलंका सोडता इतर चार संघांचे प्रत्येकी 3 सामने झाले आहेत. आजचे सामने वॉश आऊट झाल्याने ग्रुप 1 मधील चार संघ प्रत्येकी 3 गुणांवर आहेत. न्यूझीलंड, इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी 3 गुण झाले आहेत. मात्र सरस धावगतीच्या आधारे न्यूझीलंड अव्वल स्थानावर आहे.

  1. न्यूझीलंड 2 सामने 1 विजय 3 गुण +4.450 धावगती

  2. इंग्लंड 3 सामने 1 विजय 3 गुण +0.239 धावगती

  3. आयर्लंड 3 सामने 1 विजय 3 गुण -1.170 धावगती

  4. ऑस्ट्रेलिया 3 सामने 1 विजय 3 गुण -1.555 धावगती

  5. श्रीलंका 2 सामना 1 विजय 2 गुण +0.450 धावगती

  6. अफगाणिस्तान 3 सामने 0 विजय 2 गुण -0.620 धावगती

न्यूझीलंडची धावगजी +4.450 असून त्यांच्या जवळपासही कोणी नाही. इंग्लंड +0.239 धावगती राखत दुसऱ्या क्रमांकावर तर आयर्लंड -1.170 धावगती राखत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची धावगती -1.555 इतकी कमी असल्याने त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

England Australia Match Also abandoned Point Table Shakes Of Group 1
BCCI Gender Equality : चंदू बोर्डेनीं केलं जय शहांचे अभिनंदन; मोठं दिवाळी गिफ्ट मिळालं

ऑस्ट्रेलियाचे पुढचे दोन सामने हे आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत होणार आहेत. जरी ऑस्ट्रलियासाठी हे दोन्ही सामने सोपे वाटत असले तरी दोन्ही संघ झुंजार खेळ करण्यात तरबेज आहेत. तसेही टी 20 क्रिकेटमध्ये तुम्ही कागदावर किती मजबूत आहात याला महत्व नसते तर त्या दिवशी तुम्ही कशी कामगिरी करता त्यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे. दुसरीकडे इंग्लंडसमोर एका सामन्यात श्रीलंकेचे तगडे आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिलेल्या न्यूझीलंडशी त्यांना दोन हात करायचे आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थिती जरी इंग्लंड दुसऱ्या स्थानावर असली तरी त्यांच्यासाठी पुढचा प्रवास खडतरच असणार आहे.

कोणाला किती संधी?

तुलना करायची झालीच तर जरी ऑस्ट्रेलियाने त्यांचे दोन सोपे सामने जिंकले तरी त्यांचे सेमी फायनलमध्ये पात्र होण्याचे गणित हे धावगतीवर अवलंबून असणार आहेत. मात्र जर न्यूझीलंडने त्यांचे पुढे दोन्ही सामने जिंकले तर ऑस्ट्रेलियाला चांगली संधी आहे. विशेष करून न्यूझीलंडने इंग्लंडला मात दिल्यानंतर.

दुसरीकडे इंग्लंडने पुढचे दोन्ही सामने जिंकले तर त्यांच्यासाठी सेमी फायनल गाठण्यासाठी ते पुरेसे आहे. मात्र सध्या तरी श्रीलंकेची धावगती ही इंग्लंडपेक्षा चांगली आहे. जर श्रीलंकेने त्यांचे पुढच्या तीन सामन्यातील दोन सामने जरी जिंकले आणि इंग्लंडला दोनपैकी एकच सामना जिंकता आला तर लंका इंग्लंडला धक्का देऊ शकते.

या सर्वांमध्ये आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांचे गणित खूप क्लिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.