ICC Revenue Share : भारतामुळेच पैसा मिळतोय इंग्लंडलाही महत्त्व मान्य! पाकिस्तानलाच मिरची झोंबली

ICC Revenue Share ECB Back India
ICC Revenue Share ECB Back India esakal
Updated on

ICC Revenue Share ECB Back India : आयसीसीने नुकतेच आपले 2024 ते 27 या सायकलसाठी प्रस्तावित रेव्हेन्यू शेअर मॉडेल सादर केला. या मॉडेलनुसार भारताला आयसीसीच्या उत्पन्नापैक तब्बल 38.5 टक्के वाटा मिळणार आहे. मात्र या मॉडेलला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विरोध केला आहे. पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी भारताला मिळणारा वाटा हा हास्यास्पद आहे असे वक्तव्य केले होते. पाकिस्तान हा मुद्दा आयसीसीसमोर देखील मांडण्याची शक्यता आहे.

ICC Revenue Share ECB Back India
Wrestler Protest : जनताच इंग्रजांप्रमाणे सरकारला पळवून लावेल... महावीर फोगाट म्हणाले मुली कुस्तीच सोडतील

मात्र आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ रिचर्ड गोऊल्ड यांनी भारताला मिळणाऱ्या वाट्याचे समर्थन केले आहे. फायनल वर्ल्ड पॉडकास्टशी बोलताना म्हणाले की, 'रेव्हेन्यू शेअर मधील असमानता मला कळते. मात्र मला हेही माहिती आहे की भारत किती महत्त्वाचा आहे. कारण त्यांच्याशिवाय आपल्याला क्रिकेटमधून इतके उत्पन्न मिळू शकत नाही.'

ICC Revenue Share ECB Back India
Wrestler Protest FIR : शारीरिक सुखाची मागणी, असभ्य स्पर्श... FIR मध्ये बृजभूषण यांच्याविरूद्ध आहेत 'हे' 6 आरोप

भारताला मिळणारा मोठा वाटा पाहून पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानने भारताविरूद्ध आयसीसीमध्ये कुरापती करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे बीसीसीआयला मिळणारा उत्पन्नातील वाट्याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला मिळणारा उत्पन्नाचा वाटा हा हस्यास्पद आहे. याविषयी आम्ही आयसीसी चीफ ग्रेग बार्क्ले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पीसीबी म्हणते. ग्रेग बार्क्ले पाकिस्तानचा पहिल्यांदाच दौरा करणार आहेत.

वाचा आयसीसी उत्पन्नातील कोणाचा किती आहे वाटा?

BCCI ICC Revenue : 18,886 कोटी तेही वर्षाला! बीसीसीआयला मिळणार आयसीसीच्या निव्वळ उत्पन्नातील 40 टक्के वाटा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.