END vs SL : इंग्लंडने विजय आणला खेचून; गतविजेता ऑस्ट्रेलिया मायदेशात सुपर 12 मध्येच गार

England Defeat Sri Lanka Australia Out From T20 World Cup 2022
England Defeat Sri Lanka Australia Out From T20 World Cup 2022esakal
Updated on

England Defeat Sri Lanka : सेमी फायनलचे संघ निश्चित करण्यासाठी महत्वाचा असलेला इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. अखेर इंग्लंडने सामना 4 विकेट्स राखून जिंकत सेमी फायनलचे तिकिट निश्चित केले. इंग्लंडच्या या विजयाबरोबरच यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने अधिकृतरित्या सुपर 12 फेरीतच गाशा गुंडाळला.

श्रीलंकेने 20 षटकात 8 बाद 141 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा चांगल्या सुरूवातीनंतर डाव घसरला अखेर बेन स्टोक्सने 36 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी करत सामना जिंकून दिला. इंग्लंडकडून सलामीवीर अॅलेक्स हेल्सने देखील 47 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. श्रीलंकेकडून हसरंगा, डिसेल्वा आणि कुमारा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजीला शेटवच्या षटकापर्यंत झुंजवले.

1 - 10 : आक्रमक लंकेला वेसन घालण्याचा इंग्लंडचा प्रयत्न

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकने पॉवर प्लेचा फायदा घेत आक्रमक सुरूवात केली. 4 षटकात 39 धावा करणाऱ्या श्रीलंकनेला ख्रिस वोक्सने पहिला धक्का दिला. त्याने कुसल मेंडिसला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर दुसरा सलीमीवीर पथुम निसंकाने आक्रमक फटकेबाजी करत श्रीलंकेला 8 षटकात 70 धावा पार करून दिल्या. मात्र तोपर्यंत सॅम करनने धनंजाया डि सेल्वाला 9 धावांवर बाद करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. दरम्यान, श्रीलंकने जरी दोन विकेट्स गमावल्या असल्या तरी 8 च्या धावगतीने 80 धावांपर्यंत मजल मारली.

10 - 15 : लंकेची धावगती मंदावली

पहिल्या 10 षटकात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पथुम निसंकाने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने श्रीलंकेचे शतकही धावफलकावर लावले. मात्र इंग्लंडच्या स्टोक्सने चरीथ असलंकाला 9 धावांवर बाद करत लंकेला तिसरा धक्का दिला. यानंतर लंकेची धावगती मंदावली. दरम्यान, 15 षटके पूर्ण झाल्यानंतर अदिल राशिदने 45 चेंडूत 67 धावांची खेळी करणाऱ्या निसंकाला बाद करत इंग्लंडला मोठा दिलासा दिला. लंकेने 15 षटकापर्यंत 116 धावांपर्यंत मजल मारली.

15 - 20 : इंग्लंडने वर्चस्व गाजवत लंकेला रोखले 141 धावात

इंग्लंडच्या गोलंदाजांनी 15 ते 20 या शेवटच्या 5 षटकात टिच्चून मारा केला. त्यांनी या षटकात लंकेला फक्त 25 धावा करून दिल्या तर 4 फलंदाज देखील बाद केले. दुसरीकडे निसंका बाद झाल्यानंतर आलेल्या फलंदाजांना धावगती वाढवण्यात अपयश आले. मार्क वूडने तर शेवटच्या षटकात तीन फलंदाज बाद करत लंकेच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. इंग्लंडने श्रीलंकेला 20 षटकात 8 बाद 141 धावात रोखले.

England 1 - 5 : धडाकेबाज सलामी

श्रीलंकेचे 142 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने दमदार सुरूवात केली. सलामीवीर अॅलेक्स हेल्स आणि जॉस बटलर यांनी पहिल्या 5 षटकात जवळपास 10 च्या सरासरीने धावा करत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले.

England 5 - 10 : हसरंगाची कमाल लंकेचे कमबॅक

पहिल्या 5 षटकात राखलेली 10 ची धावगती 5 ते 10 षटकांमधील पहिल्या काही षटकात देखील इंग्लंडने कामय राखली. हेल्स आणि बटलर जोडीने 7 षटकात 74 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर लंकेने इंग्लंडला धक्का देण्यास सुरूवात केली. पहिल्यांदा हसरंगाने बटलरला 28 धावांवर बाद केले. त्यानंतर 10 व्या षटकात हसरंगानेच 30 चेंडूत 47 धावा करणाऱ्या अॅलेक्स हेल्सला बाद करत दोन्ही सेट झालेले सलामीवीर माघारी धाडले. यामुळे इंग्लंडची धावगती थोडी मंदावली. त्यांनी 10 षटकात 2 बाद 86 धावांपर्यंत मजल मारली.

England 10 - 15 : लंकेने इंग्लंडला निम्मा संघ केला गारद

श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी इंग्लंडला एका पाठोपाठ एक धक्के देत सामन्यावर पुन्हा पकड बनवण्यास सुरूवात केली. दरम्यान, धनंजया डि सेल्वा आणि लाहिरू कुमाराने ब्रुक्स आणि लिव्हिंगस्टोनला प्रत्येकी 4 धावांवर बाद करत त्यांची अवस्था 4 बाद 106 धावा अशी केली. त्यानंतर धनंजयाने 15 व्या षटकात मोईन अलीला 1 धावेवर बाद करत इंग्लंडची अवस्था 5 बाद 111 धावा अशी केली.

England 15 - 20 : लंकेने सामना केला टाईट

श्रीलंकेने इंग्लंडचा निम्मा संघ 111 धावांवर बाद केल्यानंतर बेन स्टोक्सवर इंग्लंडला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. मात्र त्याला साथ देणारे मोईन अली (1) आणि सॅम करन (6) धावा करून माघारी फरल्याने सामना बॉल टू रन आला.

श्रीलंकेनेही शेवटच्या 5 षटकात टिच्चून मारा करत सामना बॉल टू रन आणला. अखेर एका षटकात इंग्लंडला विजयासाठी 5 धावांची गरज होती. हा सामना 3 चेंडूत 2 धावा असा आला. मात्र अखेर ख्रिस वोक्सने चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.