England Cricket Steven Finn Announces Retirement News : इंग्लंड संघ सध्याचा एकदिवसीय विश्वचषक विजेता आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कपचा 13वा हंगाम खेळला जाणार आहे. अलीकडेच वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने अॅशेस मालिकेनंतर निवृत्ती घेतली. मोईन खाननेही पुन्हा कसोटीत परतण्यास नकार दिला. यानंतर आक्रमक फलंदाज अॅलेक्स हेल्सने माघार घेतली.
आता इंग्लंडच्या आणखी एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 34 वर्षीय वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
18 वर्षांच्या कारकिर्दीत, स्टीव्हन फिनने इंग्लंडकडून 36 कसोटी, 69 एकदिवसीय आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 3 वेळा अॅशेस मालिका जिंकणाऱ्या इंग्लिश संघाचाही तो भाग होता. फिन काही दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीशी झुंजत होता.
फिनने निवृत्तीची घोषणा करताना सांगितले की, गेल्या 12 महिन्यांपासून मी माझ्या दुखापतीशी झुंज देत होतो आणि शेवटी मला पराभव पत्करावा लागला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी इतके दिवस क्रिकेट खेळू शकलो. माझा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता.
स्टीव्हन फिनने 2010 मध्ये बांगलादेशविरुद्ध इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले. 2010-11 च्या अॅशेस मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली आणि इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्या मालिकेत स्टीव्हनने 14 विकेट घेतल्या. याशिवाय 2015 च्या अॅशेस मालिकेतही त्याने 12 विकेट घेतल्या होत्या. स्टीव्हन फिनच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 36 सामन्यात 125 विकेट घेतल्या आहेत. तर त्याने 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये 102 विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.