Sunil Gavaskar : इंग्लंडमधील स्टेडियमला आता सुनिल गावसकरांचे नाव

England Leicester Stadium Renamed as Sunil Gavaskar Stadium
England Leicester Stadium Renamed as Sunil Gavaskar Stadiumesakal
Updated on

लंडन : भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांचे भारतातील स्टेडियमला देणे सहाजिक आहे. मात्र क्रिकेटचा जन्म ज्या देशात झाला त्या इंग्लंडमध्ये (England Cricket) भारताच्या महान फलंदाजाचे नाव स्टेडियमला देण्यात आले आहे. यापूर्वी अमेरिकेतील कँटकी आणि टान्झानियाच्या जांसीबार येथील मैदानांना देखील सुनिल गावसकरांचे नाव देण्यात आले होते. आता इंग्लंडमधील एका स्टेडियमचे नाव (Stadium Name) बदलून सुनिल गावसकरांचे नाव देण्यात आले आहे.

England Leicester Stadium Renamed as Sunil Gavaskar Stadium
WI vs IND 1st ODI: भारताचा अवघ्या 3 धावांनी विजय

23 जुलै रोजी लीसेस्टर क्रिकेट ग्राऊंडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या स्टेडियमला सुनिल गावसकरांचे नाव देण्यात आले. लीसेस्टर क्रिकेट ग्राऊंडचे (Leicester Cricket Stadium) नाव बदल्यांची मोहिम भारतीय वंशाचे खासदार किथ वाज यांनी सुरू केली होती. किथ वाज इंग्लंडच्या संसदेत दीर्घ काळासाठी खासदार राहिले आहेत. त्यांनी लीसेस्टरचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनीच या स्टेडियमचे नाव सुनिल गावसकर असे करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

दरम्यान, या सन्मानाबद्दल सुनिल गावसकर यांनी 'मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्या मनात सन्मानित झाल्याची भावना आहे. लीसेस्टर मधील एका मैदानाला माझे नाव देण्यात येत आहे. लीसेस्टर खेळाला पाठिंबा देणाऱ्या तगड्या समर्थकांचे शहर आहे. इथून भारतीय क्रिकेटला जास्त पाठिंबा मिळतो. त्यामुळे हा एक मोठा सन्मान आहे.' अशी प्रतिक्रिया दिली.

England Leicester Stadium Renamed as Sunil Gavaskar Stadium
Asia Cup 2022 थीम सॉंग रिलीज, चाहत्यांनी व्हिडिओला घेतले डोक्यावर

दरम्यान, मैदानाला सुनिल गावसकरांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किथ यांनी 'सुनिल गावसकर यांनी खेळपट्टी आणि मैदानाला त्यांचे नाव देण्याची परवानगी दिल्यामुळे आम्ही सर्व सन्मानित झालो आहोत. ते जगातील महान क्रिकेटपूटंपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीने वर्षानुवर्षे क्रिकेट रसिकांना आनंद दिला आहे. ते लिटिल मास्टर नाही तर ग्रेट मास्टर देखील आहेत.' अशा भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.