Ind vs Eng 2nd Test : सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला रचावा लागेल इतिहास... आजपर्यंत भारतात कोणीही केलं नाही 'हे' काम

Ind vs Eng 2nd Test
Ind vs Eng 2nd Testsakal
Updated on

India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा (४ फेब्रुवारी) खेळ संपेपर्यंत एक विकेट गमावून 67 धावा केल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी आणखी 332 धावा करायच्या आहेत, तर त्यांच्या 9 विकेट शिल्लक आहेत. अशा स्थितीत सध्या भारताचा वरचष्मा दिसत आहे.

असो, आजपर्यंत भारतीय भूमीवर कधी 387 पेक्षा जास्त धावांचे आव्हान गाठता आलेले नाही. अशा परिस्थितीत जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर तो इतिहास रचेल. भारतीय भूमीवर सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम भारताच्याच नावावर आहे. 2008 मध्ये इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यात भारतीय संघाने 387 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतक झळकावले होते आणि भारतीय संघ हा सामना 6 गडी राखून जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

भारतात 300 पेक्षा जास्त धावांचा लक्ष्याचा पाठलाग आतापर्यंत कोणत्याही परदेशी संघाला करता आलेला नाही. भारताविरुद्ध आपल्या भूमीवर सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजने 1987 साली दिल्ली कसोटी सामना पाच विकेटने जिंकला होता. विशेष बाब म्हणजे त्या कसोटी सामन्यानंतर भारतीय भूमीवर चौथ्या डावात कोणत्याही परदेशी संघाला 200 धावांचे लक्ष्य गाठता आलेले नाही.

भारतीय भूमीवर कसोटीत टॉप-10 धावांचा पाठलाग

  • 387 भारत विरुद्ध इंग्लंड, चेन्नई 2008

  • 276 वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, दिल्ली 1987

  • 276 भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली 2011

  • 261 भारत विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरू 2012

  • 254 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मुंबई 1964

  • 216 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली 2010

  • 207 इंग्लंड विरुद्ध भारत, दिल्ली 1972

  • 207 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू 2010

  • 203 भारत विरुद्ध पाकिस्तान, दिल्ली 2007

  • 194 ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, बेंगळुरू 1998

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग भारताविरुद्ध आहे. 2022 साली बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लिश संघाने 378 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय भूमीवर इंग्लंडचा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग 207 धावांचा आहे, जो त्यांनी 1972 मध्ये दिल्ली कसोटीत केला होता.

इंग्लंडने आपल्या कसोटी क्रिकेट इतिहासात चौथ्या डावात तीन वेळा 399 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत, तरीही इंग्लंडला तिन्ही वेळा सामना जिंकता आला नाही. असो, चौथ्या डावात फलंदाजी करणे अवघड काम आहे.

जसप्रीत बुमराह ज्याप्रकारच्या फॉर्ममध्ये आहे तो त्यांच्यासाठी टेन्शनचा विषय आहे. फिरकी गोलंदाज आर. अश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवही घातक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.