England vs India 1st ODI : भारतीय संघाने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जोरकस खेळ केला म्हणून आम्ही पहिल्या दोन टी-२० सामन्यात योग्य लढत देऊ शकलो नाही. आता आम्ही जास्त धाडसी खेळ करून दाखवायला उत्सुक आहोत. काही खूप दर्जेदार खेळाडू तुफान फॉर्ममध्ये आहेत ते संघात दाखल होत आहेत. म्हणून भारतीय संघासमोर एकदिवसीय मालिकेचे आव्हान मोठे असेल, अशी सिंहगर्जना इंग्लंडचा कप्तान जोस बटलरने केली आहे.
बटलरचे म्हणणे पोकळ नाहीये. जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि ज्यो रूट संघात दाखल झाल्याने इंग्लंड संघाची ताकद वाढली आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघाला टक्कर द्यायला किती वरचढ खेळ करून दाखवावा लागेल, याची पूर्ण कल्पना आहे.
लंडनच्या प्रसिद्ध थेम्स नदीच्या पैलतीराला म्हणजेच ओव्हल मैदानावर पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. भारतीय संघातील फलंदाजांना माहीत आहे, की पहिली फलंदाजी आली, तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल आणि समजा पाठलाग करायची वेळ आली, तरीही मोठ्याच धावसंख्येचा ढिगारा उपसावे लागणार आहे. ओव्हल मइंदवाराची खेळपट्टी नेहमी फलंदाजीला साथ देते. सामन्यात धावांचा पडणारा पाऊस अनुभवायला सुट्टी टाकून प्रेक्षक मैदनात गर्दी करणार आहेत.
दरम्यान विराटच्या अपयशानंतरही कर्णधार रोहितने त्याची पाठलाखण केली, तो म्हणाला, फॉर्म हा तत्कालीन असतो, दर्जा कायमस्वरूपी असतो. विराटच्या सध्याच्या खराब फॉर्मकडे बघून इकडून त्याच्यावर टीका करणे आम्हाला मान्य नाही. याचा अर्थ असा, की संघ व्यवस्थापन विराटची पाठराखी करत आहे; तरीही संघ व्यवस्थापनाचा त्याला किती संधी या मुद्द्यावरून संयम सुटू लागला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.