ENG v IND : पहिल्या सामन्यात भारताचा 50 धावांनी विजय; मालिकेत 1-0 ची आघाडी

ENG v IND Live T20
ENG v IND Live T20esakal
Updated on

साऊथहॅम्पटन : भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने फलंदाजी करताना दमदार 51 धावांची अर्धशतकी खेळी केली तर गोलंदाजीत 33 धावात 4 विकेट घेतल्या. हार्दिकच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव करत मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. हार्दिकला गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि पदार्पण करणाऱ्या अर्शदीपने प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली. या सर्वांनी मिळून इंग्लंडचा डाव 148 धावात संपवला.

148-10 : अर्शदीपने अखेरची घरघर संपवली

अर्शदीप सिंगने दोन विकेट घेत इंग्लंडचा डाव 148 धावात संपवला. भारताने सामना 50 धावांनी सामना जिंकला.

106-7 : हार्दिकचा जलवा तिसऱ्या षटकातही कायम

हार्दिकने आपल्या स्पेलमधील पहिल्या दोन षटकात तीन इंग्रज टिपले होते. आता त्याने तिसऱ्या षटकात सॅम करनची शिकार करत आपला चौथा इंग्रज टिपला.

100-6 : चहलने तोडली अर्धशतकी भागीदारी

जेसन रॉय बाद झाल्यानंतर मोईन अली आणि हॅरी ब्रूक यांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. मात्र 13 वे षटक टाकणाऱ्या चहलने पहिल्या चेंडूवर 28 धावा करणाऱ्या ब्रूकला आणि पाचव्या चेंडूवर 36 धावा करणाऱ्या मोईन अलीला बाद केले.

33-4 : हार्दिकने केली तिसरी शिकार 

हार्दिकने 16 चेंडूत संथ गतीने 4 धावा करणाऱ्या जेसन रॉयला देखील बाद करत इंग्लंडला 33 धावांवर चौथा धक्का दिला.

29-3 : हार्दिकचा डबल धमाका 

हार्दिक पांड्याने आपल्या एकाच षटकात 14 चेंडूत 21 धावा करणाऱ्या डेव्हिड मलान आणि लिम लिव्हिंगस्टोनला (०) बाद करत इंग्लंडला पाठोपाठ दोन धक्के दिले.

भारताने पहिल्याच षटकात इंग्लंडला दिला मोठा धक्का

भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. त्याने इंग्लंडचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज जोस बटलरचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

198-8 : भारताचे इंग्लंडसमोर 199 धावांचे आव्हान

हार्दिकचे दमदार अर्धशतक

लिम लिव्हिंगस्टोने भारताला दिला पाचवा धक्का

लिम लिव्हिंगस्टोनने अक्षर पटेलला 17 धावांवर बाद केले.

126-4 : ख्रिस जॉर्डनने भारताला दिला चौथा धक्का

ख्रिस जॉर्डनने भारताला अजून एक धक्का देत 19 चेंडूत 39 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवला बाद केले.

10 व्या षटकात भारताचे शतक

भारताने जरी पहिल्या 10 षटकात 3 विकेट गमावल्या असल्या तरी धावगती चांगली राखली. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने 10 व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले.

89-3 : भारताला तिसरा धक्का

इशान किशन बाद झाल्यानंतर दीपक हुड्डा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी रचली. मात्र ख्रिस जॉर्डनने 17 चेंडूत 33 धावा करणाऱ्या दीपक हुड्डाला बाद केले.

मोईन अलीने दिला भारताला दुसरा धक्‍का

मोईन अलीने रोहित पाठोपाठ इशान किशनला 8 धावांवर बाद करत भारताचा दुसरा सलामीवीर देखील माघारी धाडला.

भारताला पहिला धक्का; आक्रमक सुरुवात नंतर रोहित शर्मा आउट

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारत : रोहित शर्मा, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल

इंग्लंड : जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलान, मोईन अली, लियाम लिविंगस्टोन, हैरी ब्रुक, सैम करेन, क्रिस जॉर्डन, टाइमल मिल्स, रीस टॉपली आणि मैथ्यू पार्किंसन.

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतला निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत टी 20 मालिकेसाठी सज्ज

कसोटी सामना हरल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरूद्धच्या टी 20 मालिकासाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.