IND vs ENG Live score 2nd T20I: भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंचा संपूर्ण संघ 121 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पोहचला. भारताने 49 धावांनी सामना जिंकत ज्या मैदानावर इंग्लंडने कसोटीत भारताला मात दिली होती त्याच एजबेस्टनमध्ये टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडला मात देत मालिकेवर कब्जा केला.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत तीन विकेट घेतल्या. त्याने इंग्लंडच्या जेसन रॉयला इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर बाद करत दमदार सुरूवात केली होती. त्याला भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून मोईन अलीने 35 तर डेव्हिड विलीने 33 धावांचे योगदान दिले.
भारताने इंग्लंडला दुसऱ्या टी 20 सामन्यात 121 धावात गुंडाळात सामना 49 धावांनी जिंकला. याचबरोबर तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली.
भारताचे 171 धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडची अवस्था 8 बाद 95 अशी झाली. भारताने सामन्यावर आपली पकड अजून घट्ट केली.
11व्या षटकात जसप्रीत बुमराहने दुसऱ्या चेंडूवर सॅम करनला बाद केले. बुमराहची ही दुसरी विकेट आहे. इंग्लंडने 60 धावांवर 6वी विकेट गमावली, भारत विजयाच्या जवळ.
डेव्हिड मलानला बाद करून युजवेंद्र चहलने यजमानांना 5 वा धक्का दिला. मोईन अली सॅम कुरनसह क्रीज खेळत आहे.
हॅरी ब्रुकला बाद करून युझवेंद्र चहलने इंग्लंडला चौथा धक्का दिला आहे. ब्रुक 8 धावा काढून बाद झाला.
इंग्लंडची तिसरी विकेट पडली, जसप्रीत बुमराहने लियाम लिव्हिंगस्टन केले आऊट.
भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. जोस बटलर 4 धावा करून यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. इंग्लंडचा स्कोअर 11/2.
पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला धक्का बसला. जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने कर्णधार रोहित शर्माच्या हाती झेलबाद केले. जोस बटलर आणि डेव्हिड मलान क्रीजवर आहेत. इंग्लंडची धावसंख्या 0.3 षटकात एक विकेट गमावत शून्य आहे.
प्रथम फलंदाजी करताना रवींद्र जडेजाच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 8 गडी गमावून 170 धावा केल्या. इंग्लंडकडून क्रिस जॉर्डनने चार आणि डेब्युटन ग्लेसनने तीन विकेट घेतले.
19व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर क्रिस जॉर्डनने भुवनेश्वर कुमारला बाद करून भारताला 8वा धक्का दिला. जॉर्डनची ही चौथी विकेट आहे, तर ग्लेसनने तीन बळी घेतले आहेत. भारताचा स्कोर 159/8
क्रिस जॉर्डनने 17व्या षटकातच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलला झेलबाद केले. भारताला 7 वा धक्का बसला. हर्षल 6 चेंडूत 13 धावा काढून बाद झाला. 17 षटकांनंतर भारताने 7 गडी गमावून 145 धावा केल्या आहे.
तीन धावा चोरण्याच्या प्रयत्नात दिनेश कार्तिक धावबाद. भारताला 122 धावांवर सहावा धक्का. कार्तिकने 12 धावा करून आऊट झाला.
भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये 11व्या षटकात क्रिस जॉर्डनने याच षटकात सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला बाद करून भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. टीम इंडियाची धावसंख्या 6 षटकांत 61/1 वरून 11 षटकांत 89/5 झाली आहे. दिनेश कार्तिकसह रवींद्र जडेजा क्रीजवर उपस्थित आहे.
भारताचा अर्धा डाव संपला 10 षटकांनंतर धावसंख्या 3 गडी गमावून 86 धावा. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. पंड्या 9 आणि सूर्यकुमार 15 धावा करून खेळत आहेत.
भारताचा स्कोअर - 69/3
भारताची धावसंख्या 8 षटकांअखेर तीन गडी बाद 69 धावा आहे. सूर्यकुमार यादव 6 तर हार्दिक पांड्या 1 धावा करत खेळत आहे.
रिचर्ड ग्लीसनने रोहित शर्मानंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतला एकाच षटकात तंबूत माघारी पाठवले. कोहली 1 तर पंत 26 धावा करून बाद झाला. भारत 61/3
भारताला पहिला धक्का 49 धावांवर कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने बसला. रोहितने या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. आता विराट कोहली फलंदाजीला आला आहे.
भारतीय प्लेइंग इलेव्हनकडे पाहता विराट कोहली रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसणार असल्याचे बोलले जात होते. पण रोहितने ऋषभ पंतसोबत डावाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत : रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल
इंग्लंड : जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मालन, लियाम लिविंगस्टोन, हैरी ब्रुक, मोइन अली, सैम कुरेन, डेविड विली, क्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लीसन, मैथ्यू पार्किंसन
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. हा सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.