चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या बाजूनं झुकलेला सामना आता पुन्हा भारताच्या बाजुनं वळलाय. पुजारा आणि रहाणेनं शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरल्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या दिवशी रिषभ पंतवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तो अवघ्या 22 धावा करुन परतला. दोनशेच्या आत भारताने 7 विकेट गमावल्यानंतर सामना इंग्लंडच्या बाजूने झुकतोय असे वाटत होते. पण ईशांत शर्माच्या मोजक्या 16 धावांनी भारतीय संघ सहजासहजी सामना सोडणार नसल्याचे संकेत दिले. तो तंबूत परतल्यानंतर जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीने कसलेल्या फलंदाजासारखी दमदार खेळी करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले. या जोडीने नवव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करत टीम इंडियाला 250 + आघाडी मिळवून दिली.
मोहम्मद शमीने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. मोईन अलीच्या गोलंदाजीवर 92 मीटर षटकार खेचत शमीने क्रिकेटच्या पंढरीत अवस्मरणीय अर्धशतक झळकावले. त्याने 57 चेंडूत उत्तुंग फटक्यासह अर्धशतकाला गवसणी घातली. शमीसह बुमराहच्या खेळीचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. जो सामना आपण वाचवणार कसा? हा प्रश्न सतावत होता तो प्रश्न शमी-बुमराहच्या खेळीमुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंना आणि त्यांचा कर्णधार असलेल्या ज्यो रुटला पडला असेल.
मुंबई इंडियन्सने खास ट्विट करत शमीच्या अर्धशतकाचं कौतुक केले आहे. 'धागा खोल दिया...' अशा शब्दांत मुंबई इंडियन्सकडून शमीच्या अर्धशतकाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देखील या जोडीचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.