IND vs ENG : क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियानं फडकावली विजयी पताका!

मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला क्लीन बोल्ड करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
IND vs ENG
IND vs ENGTwitter
Updated on

England vs India 2nd Test Day 5 : शमी-बुमराहच्या विक्रमी फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने क्रिकेटच्या पंढरीत विजयी जल्लोष साजरा केला. दुसऱ्या कसोटी सामन्यातील 151 धावांच्या विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 272 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमान इंग्लंडचा संघाचा दुसरा डाव 120 धावांत आटोपला. मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला क्लीन बोल्ड करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार ज्यो रुटनं 60 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने केलेली 33 धावांची खेळी सर्वोच्च ठरली. जोस बटलरच्या 25 धावा आणि मोई अलीच्या 13 धावा वगळता अन्य एकाही इंग्लिश क्रिकेटरला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जसप्रित बुमराहच्या 3 , इशांत शर्मा 2 आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

IND vs ENG
Video: विराट, इशांत अन् DRS... पाहा मैदानावर नक्की काय घडलं

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. बॅटिंगमध्ये धमाका दाखवणाऱ्या बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याच्यापाठोपाठ शमीने दुसऱ्या षटकात टीम इंडियाला दुसरे यश मिळवून देत इंग्लंडला अडचणीत आणले. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची नामुष्की इंग्लंडवर ओढावली. इशांत शर्माने हसीब हमीदच्या रुपात इंग्लंडला तिसरा धक्का दिला. चहापानापूर्वी जॉनी बेयरस्टोच्या रुपात इशांतने टीम इंडियाला आणखी एक यश मिळवून दिले. बुमराहने कर्णधार ज्यो रुटला बाद करत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला.

IND vs ENG
IND vs ENG: सेहवागला शमी-बुमराहमध्ये दिसली द्रविड-लक्ष्मणची झलक

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात रोहित शर्मा (83) आणि लोकेश राहुल (129) यांनी भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीचा खेळ पाहून भारतीय संघ पहिल्या डावात चारशे पार धावसंख्या उभारेल असे वाटत होते. पण भारताचा पहिला डाव 364 धावांवरच आटोपला. इंग्लंडने या धावांचा पाठलाग करताना कर्णधार ज्यो रुटच्या 180 धावांच्या खेळीच्या जोरावर 27 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. आघाडीच्या तीन फलंदाजांनी निराश केल्यानंतर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं शतकी भागीदारी करत संघाला मॅचमध्ये आणले. तळाच्या फलंदाजीत शमी आणि बुमराहने विक्रमी भागीदारी करत इंग्लंडसमोर 272 धावांचे चॅलेंज ठेवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.