IND vs ENG : किंग कोहली लक्षात ठेवून व्याजासह परतफेड करतो!

इंग्लंडने सातवी विकेट गमावल्यानंतर सॅम कुरेनची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली रॉबीन्सला तो डिवचताना दिसले.
IND vs ENG
IND vs ENGTwitter
Updated on

England vs India 2nd Test Day 5 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक खेळ रंगल्याचे काही क्षण अनुभवायला मिळाले. भारतीय संघाच्या डावात इंग्लंड गोलंदाजांनी जी बडबड केली त्याची परतफेड खुद्द टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात रॉबिन्सन मैदानात आल्यावर करताना दिसला. इंग्लंडने सातवी विकेट गमावल्यानंतर सॅम कुरेनची जागा घेण्यासाठी आलेल्या ओली रॉबीन्सला तो डिवचताना दिसले. त्याच्याशिवाय एका ओव्हरमध्ये मोईन अली आणि सॅम कुरेनला तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या सिराजनेही रॉबिन्सनला खुन्नस दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

इंग्लंडच्या डावातील 38 व्या षटकात सिराजने मोईन अलीला विराट कोहलीकरवी झेलबाद करत इंग्लंडला सहावा धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या डावखुऱ्या सॅम कुरेनला सिराजने आल्या पावली माघारी धाडले. इंग्लंडचा नवोदित खेळाडून आणि बॉलिंगवेळी भारतीय खेळाडूंना डिवचणारा ओली रॉबिन्सन ज्यावेळी मैदानात आला त्यावेळी सिराज हॅटट्रिकवर होता. या सामन्यात सिराजला दुसऱ्यांदा हॅटट्रिकची संधी होती. पण त्याला ती यशस्वी करुन इतिहास रचण्यात अपयश आले.

IND vs ENG
Video: विराट, इशांत अन् DRS... पाहा मैदानावर नक्की काय घडलं

दुसरीकडे किंग कोहली विराटने ओली रॉबिन्सचे लक्ष विचलित करण्याचे कार्ड खेळल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या बॅटिंगवेळी तो बडबड होता त्याचा जणून कोहली बदलाच घेत होता. त्यानंतर विराट कोहली बटलरला काहीतरी सांगतानाही दिसले. कोहलीने जीवदान दिल्यामुळे 70 हून अधिक चेंडू खेळणारा बटलर यावेळी फक्त तो काय बोलतोय तो ऐकताना दिसले. हा सर्व प्रकार घडत असताना कोहलीने पंचांशी देखील काहीतरी चर्चा केल्याचे पाहायला मिळाले.

IND vs ENG
IND vs ENG: सेहवागला शमी-बुमराहमध्ये दिसली द्रविड-लक्ष्मणची झलक

इंग्लंडचा कर्णधार जो रुटन टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने लोकेश राहुलचे शतक आणि रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 364 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. पण ज्यो रुटच्या नाबाद 180 धावांच्या जोरावर इंग्लंडने 27 धावांची आघाडी घेतली. बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघाने पुन्हा सामन्यात कमबॅक केले. सामन्यातील चढ-उताराप्रमाणे दोन्ही संघातील खेळाडूंमध्येही शाब्दिक खेळाच तरंग अनुभवायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()