ENG vs IND : इंग्लंडकडून अखेरच्या षटकात भारताचा पराभव, मालिका 2-1ने जिंकली

इंग्लंडने शेवटचा T20 सामना 17 धावांनी जिंकला, भारताने मालिका 2-1 ने जिंकली
ENG vs IND Live 3rd T20
ENG vs IND Live 3rd T20सकाळ
Updated on

England vs India 3rd T20I Live Cricket Score : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना नॉटिंगहॅममध्ये खेळवला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 215 धावा करत भारताला विजयासाठी 216 धावांचे लक्ष्य दिले. डेव्हिड मलानने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 77 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन 29 चेंडूत 42 धावा करून नाबाद परतला. हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 तर आवेश खान आणि उमरान मलिक यांनी 1-1 बळी घेतला.

216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत (1), विराट कोहली (11), कर्णधार रोहित शर्मा (11) आणि दिनेश कार्तिक (6) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र सूर्यकुमारने अवघ्या 48 चेंडूत शतक झळकावले. टी-20 मध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय ठरला आहे. चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो केएल राहुलनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. इंग्लंडने शेवटचा T20 सामना 17 धावांनी जिंकला, भारताने मालिका 2-1 ने जिंकली.

रोहित शर्माने आज प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदलाव केले रवी बिश्नोई, आवेश खान, उमरान मलिक आणि श्रेयस अय्यर यांना संधी दिली आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

इंग्लंडने शेवटचा T20 सामना 17 धावांनी जिंकला, भारताने मालिका 2-1 ने जिंकली

भारताला सहावा धक्का

भारताची सहावी विकेट पडली आहे. रवींद्र जडेजाने सात धावा केल्या. भारताचा स्कोअर 17.3 ओव्हरमध्ये 6 गडी बाद 173 आहे.

सूर्यकुमार यादवचे इंग्लंडविरुद्ध शतक

सूर्यकुमार यादवने 24 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले. त्याने 48 चेंडूत 12 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. भारताला विजयासाठी आता 19 चेंडूत 50 धावांची गरज आहे. आता रवींद्र जडेजा क्रीझवर उतरला आहे.

श्रेयस अय्यर 28 धावा करून बाद

श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला चौथा धक्का बसला. अय्यरने 28 धावा केल्या आणि झेलबाद झाला. दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे. भारताला विजयासाठी 24 चेंडूत 61 धावांची गरज आहे.

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यात 100 धावांची भागीदारी पूर्ण

सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यात 100 धावांची भागीदारी पूर्ण केले. शेवटच्या दोन षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांनी चार षटकार मारले. आता टीम इंडियाला विजयासाठी 36 चेंडूत 84 धावांची गरज आहे.

सूर्यकुमार यादवने ठोकले 32 चेंडूत अर्धशतक

सूर्यकुमार यादवने तिसऱ्या टी-20 सामन्यात 32 चेंडू, सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक ठोकले. भारतीय संघाला आता विजयासाठी 48 चेंडूत 120 धावांची गरज आहे. श्रेयस अय्यर 17 धावा करून खेळत आहे.

सूर्या-श्रेयसमध्ये 50 धावांची भागीदारी

सामन्यात सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाला पुनरागमन केले आहे. दोघांमध्ये 50 धावांची भागीदारी झाली आहे. आणि आता 10 षटके बाकी असताना टीम इंडियाला विजयासाठी 130 पेक्षा जास्त धावांची गरज आहे. भारताचा स्कोर 83/3 आहे.

टीम इंडियाची हालत खराब; 31 धावांवर रोहित-कोहली-पंत आऊट

पॉवरप्लेमध्ये भारतीय संघला केवळ 32 धावा करता आल्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टोपलीने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बाद केले. सध्या सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर ही जोडी क्रीझवर आहे.

टीम इंडियाला दुसरा धक्का, विराट कोहली पुन्हा अपयशी

216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत (1) आणि विराट कोहली (11) पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यावेळी क्रीजवर उपस्थित आहेत.

ऋषभ पंत यावेळी सलामीला अपयशी ठरला, एक रन करून आउट

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यावेळी सलामीला अपयशी ठरला. केवळ एक धाव घेऊन तो बाद झाला. भारताने दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली आहे.

इंग्लंडने भारतासमोर ठेवले 216 धावांचे लक्ष्य

इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 215 धावा करत भारताला विजयासाठी 216 धावांचे लक्ष्य दिले. डेव्हिड मलानने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 77 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन 29 चेंडूत 42 धावा करून नाबाद परतला. हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 तर आवेश खान आणि उमरान मलिक यांनी 1-1 बळी घेतला.

बिश्नोईने घेतल्या 'बॅक टू बॅक' दोन विकेट

रवी बिश्नोईने मालन आणि लिव्हिंगस्टोनची 84 धावांची भागीदारी मोडली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मालनने चेंडू हवेत उडवला आणि पंतने सोपा झेल घेत त्याला 77 धावा करत आऊट झाला. त्याचवेळी त्याने मोईन अलीलाही आपल्या जाळ्यात अडकवले. बिश्नोईने एकाच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. इंग्लंड 169/5

लिव्हिंगस्टोन-मालनची फलंदाजी आक्रमक, इंग्लंड मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

मलान आणि लिव्हिंगस्टोन यांनी चौथ्या विकेटसाठी 28 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली. मलन 70 आणि लिव्हिंगस्टोन 13 धावांवर खेळत आहेत.

हर्षल पटेलने इंग्लंडला दिला तिसरा धक्का

हर्षल पटेलने यॉर्करवर सॉल्टला क्लीन बॉलिंग करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॉल्टने 8 धावा केल्या, आता लियाम लिव्हिंगस्टोन फलंदाजीला आला आहे.

इंग्लंडला दुसरा धक्का; उमरानने रॉयला केले आऊट

उमरान मलिकने 8व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. बाहेर जाणार्‍या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात चेंडू रॉयच्या बॅट आऊट झाला.

पॉवरप्लेमध्ये इंग्लंड 52/1

पहिल्या 6 षटकांमध्ये जोस बटलरची विकेट गमावल्याने यजमानांनी 52 धावा फलकावर लावल्या आहेत. रॉय 23 आणि मलान 7 धावांवर खेळत आहेत.

इंग्लंडला पहिला धक्का: आवेश खानने बटलरला केले बोल्ड

आवेश खानने जोस बटलरला बाद करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. बटलरने 18 धावा केल्या. इंग्लंडची पहिली विकेट 31 धावांवर पडली आहे.

बटलर अन् रॉयने इंग्लंडला दिला आक्रमक सुरुवात

इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि जेसन रॉय मैदानात उतरली आहे. भुवनेश्वर कुमार आज खेळत नसेल तर या दोन्ही फलंदाजांनी सुटकेचा श्वास घेतला असेल. आवेश खान भारतासाठी पहिले षटक टाकत आहे

भारत : रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक, रवि बिश्नोई

इंग्लंड : जेसन रॉय, जोस बटलर , डेविड मालन, फिलिप साल्ट, लियाम लिविंगस्टोन, हैरी ब्रुक, मोइन अली, डेविड विली, क्रिस जॉर्डन, रीस टॉपली, रिचर्ड ग्लीसन

इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतला निर्णय

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने तिसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करेल. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये चार बदल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.