बर्मिंगहम : इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारताचा सात गडी राखून पारभव करत पाच कसोटी सामन्यांची मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. भारताने पाचव्या कसोटीत विजयासाठी ठेवलेल्या 378 धावांचा 3 फलंदाजांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला. इंग्लंडने यापूर्वी चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2019 मध्ये 359 धावांचा पाठलाग केला होता. तो विक्रम आज इंग्लंडने मोडला. इंग्लंडकडून जो रूटने दमदार शतक ठोकले. त्याला साथ देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने देखील सलग दुसऱ्या डावात शतकी खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा मोठा वाटा उचलला.
जॉनी बेअरस्टोने पाचव्या सामन्याच्या पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही शतक ठोकले. त्याने जो रूट सोबत नाबाद 269 धावांची भागीदारी रचली. याचबरोबर या दोघांनी इंग्लंडच्या विजयाची औपचारिकता संपवली.
जो रूटने कसोटीतील आपले 28 वे शतक ठोकत भारताविरूद्धच्या पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजयीपथावर घेऊन गेला.
जो रूट आणि बेअरस्टो हे दोघेही नव्वदीत पोहचले असून इंग्लडने 300 धावांचा टप्पा पार केला आहे.
सामन्याच्या पाचव्या दिवशी जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी दमदार सुरूवात करत विजयासाठीचे आव्हान 100 च्या आत आणले. दोघेही 80 च्या घरात पोहचले आहेत.
इंग्लंडविरूद्धच्या पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचे फक्त तीन फलंदाज बाद करता आले. तर जो रूट (74) आणि बेअरस्टोने (72) आक्रमक फलंदाजी करत दिवसअखेर 259 धावांपर्यंत मजल मारली. आता त्यांना विजयासाठी फक्त 119 धावांची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.