क्रिकेटमध्ये 12 जुलै ठरला Duck Day; तब्बल 9 फलंदाज शुन्यावर बाद

England Vs India Ireland Vs New Zealand 12th July 2022 strange day In Cricket 9 Batsmen Out On Duck
England Vs India Ireland Vs New Zealand 12th July 2022 strange day In Cricket 9 Batsmen Out On Duck esakal
Updated on

12th July 2022 strange day In Cricket : भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यातील 12 जुलैला झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने इंग्लंडचा संपूर्ण संघ 110 धावात गुंडाळला होता. भारतकडून जसप्रीत बुमराहने 6 तर मोहम्मद शमीने 3 बळी टिपले. विशेष म्हणजे इंग्लंडचे तब्बल 4 फलंदाज खातेही न उघडता डकवर बाद झाले. दरम्यान, याच दिवशी आयर्लंड आणि न्यूझीलंड (Ireland Vs New Zealand) यांच्यातही एक वनडे सामना खेळला जात होता. या सामन्यात देखील 5 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.

England Vs India Ireland Vs New Zealand 12th July 2022 strange day In Cricket 9 Batsmen Out On Duck
ENG vs IND : थांबा आधी 'बदकं' एका रांगेत आणतो... जाफरनं वॉनला केलं ट्रोल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स आणि लिम लिव्हिंगस्टोन शुन्यावर बाद झाले. भारताने आपला एकही फलंदाज न गमावता इंग्लंडचे विजयासाठी ठेवलेले 111 धावांचे आव्हान 18.4 षटकातच पार केले. रोहित शर्माने 76 तर शिखर धवनने 31 धावा केल्या.

England Vs India Ireland Vs New Zealand 12th July 2022 strange day In Cricket 9 Batsmen Out On Duck
ISSF Shooting World Cup : शाहू तुषार माने, मेहुली घोष यांचा सुवर्णवेध

दुसरीकडे 12 जुलैलाच आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आयर्लंडचे पॉल स्टर्लिंग, क्रेग यंग आणि सोशुआ लिटिल हे फलंदाज शुन्यावर बाद झाले. 12 जुलैला शुन्यावर बाद होण्याच्या घटना इथंच थांबल्या नाहीत तर न्यूझीलंडचे मार्टिन गप्टिल आणि विंग यंग देखील शुन्यावर बाद झाले. त्यामुळे 12 जुलैला एका दिवसात तब्बल 9 फलंदाज शुन्यावर बाद झाले. त्यामुळे क्रिकेट इतिहासात आता 12 जुलै हा Duck Day म्हणून साजरा करण्यास काही हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.