बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेतील स्थगित करण्यात आलेली पाचवी कसोटी येत्या 1 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. एजबेस्टन येथे खेळवल्या जाणाऱ्या सामन्याची परिस्थिती त्या मालिकेत असलेल्या स्थितीपेक्षा खूपच बदलली आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांसह प्रशिक्षक देखील बदलले आहेत. इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक आता न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम आहे तर भारताचा राहुल द्रविड. दोघांचीही शैली एकमेकांविरूद्ध आहे. त्यामुळे या एकमेव कसोटी सामन्यात मॅक्युलची आक्रमकता जिंकणार की राहुल द्रविडचा संयम हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (England Vs India Test Match Is a Fight Between Brendon McCullum Aggression and Rahul Dravid Patience)
संघात मोठे बदल विरूद्ध सेट प्लेईंग इलेव्हन
ब्रँडन मॅक्युलम इंग्लंडचा प्रशिक्षक झाल्यापासून संघात अनेक बदल करण्यात येत आहेत. संघात जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या दोन कसोटीत अँडरसनला खेळवण्यात आले आणि त्यानंतर तिसऱ्या कसोटीत त्याला स्थान देण्यात आले नाही. याचबरोबर ऑली पोपला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याबाबतही तसेच झाले. तो संघात आल्याने जो रूटवरचा ताण थोडा कमी झाला. मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून संघात अनेक बदल होत आहेत.
दुसरीकडे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड एक सेट प्लेईंग इलेव्हन घेऊन खेळण्याच्या बाजूचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत देखील तो सगळ्या 5 सामन्यात एकच भारतीय संघ घेऊन उतरला होता. आवेश खानला सुमार कामगिरीनंतरही संधी देण्यात आली. त्याने चौथ्या सामन्यात सामना जिंकून देणारा स्पेल टाकला.
आर या पार विरूद्ध प्रक्रियेवर भर
इंग्लंडचा नवा प्रशिक्षक मॅक्युलम संघात आल्यापासून इंग्लंडच्या संघाचे चरित्रच बदलले आहे. आता इंग्लंडचा संघ आर या पार लढाई करायच्या इराद्यानेच मैदानावर उतरत आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत संघातील फलंदाजांनी केलेली आक्रमक फलंदाजी याचे उत्तम उदाहरण आहे. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यापासून संघाची मानसिकता बदलली असल्याचे सांगितले. संघाने सलग तीन कसोटी सामन्यात 270 पेक्षा जास्त धावांचे टार्गेट पार केले आहे.
राहुल द्रविड प्रोसेसवर भर देतो. द्रविड आधी वेळ घेतो आणि मग रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो. भारतीय अ संघाचे प्रशिक्षकपद भुषवत असताना द्रविडने भारतीय वरिष्ठ संघासाठी एकापेक्षा एक चांगले खेळाडू तयार करून दिले. मोहम्मद सिराज पासून श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल या खेळाडूंना त्यांनी वेळ देऊन तयार केले.
तरूणांना संधी विरूद्ध अनुभवावर भर
ब्रँडन मॅक्युलने प्रशिक्षक म्हणून आपल्या पहिल्या कसोटी मालिकेत तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. मॅथ्यू पॉट्स, मॅट पार्किंसन आणि जेमी ओव्हरटर्न यांनी इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले. पॉट्स आणि ओव्हरटर्नने प्रभावी कामगिरी केली.
दुसऱ्या बाजूला राहुल द्रविड अनुभवावर जास्त भर देतो. त्याने न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर पुजारा आणि रहाणेला संधी मिळाली. तर श्रीलंका दौऱ्यावर फॉर्ममध्ये नसलेल्या या दोन्ही खेळाडूंना वगळण्यात आले. मात्र काऊंटी मधील दमदार कामगिरीनंतर पुजाराने इंग्लंड दौऱ्यावरील संघात पुन्हा एकदा पुनरागमन केले. यावरून राहुल द्रविड अनुभवाला प्राधान्य देतो असे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.