ENG vs IND : इंग्लंडलने चौथ्या डावात चेस केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?

England vs India What Are The 4th Inning Highest Run Chase by England
England vs India What Are The 4th Inning Highest Run Chase by Englandesakal
Updated on

बर्मिंगहम : भारताने दुसऱ्या डावात 245 धावा करत दुसऱ्या डावात 377 धावांची आघाडी घेतली. यामुळे इंग्लंडला (England vs India) आता सामना जिंकण्यासाठी दीड दिवसात 377 धावा कराव्या लागतील. इंग्लंडने सामन्याच्या चौथ्या डावात (4th Inning Highest Run Chase by England)आतापर्यंत 359 ही सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यांनी ही कामगिरी 2019 मध्ये केली होती.

England vs India What Are The 4th Inning Highest Run Chase by England
ENG vs IND Day 4 : दिवसअखेर रूट - बेअरस्टोची दीडशतकी भागीदारी

भारताने (India) पाचव्या कसोटीत सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या डावात 416 धावा करणाऱ्या भारताने इंग्लंडचा पहिला डाव 284 धावात संपुष्टात आणला होता. भारताने पहिल्या डावात इंग्लंडवर 132 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद 245 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे आव्हान ठेवले. आता हे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला जर विजय मिळवायचा असेल तर इतिहासच रचावा लागले.

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने आतापर्यंत चौथ्या डावात सर्वाधिक 359 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यांनी हा कारनामा 2019 ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध केला होता. त्यावेळी बेन स्टोक्सने धडाकेबाज खेळी केली होती. आता भारताने इंग्लंडसमोर त्यापेक्षाही मोठे म्हणजे 378 धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी आता आपलेच 359 धावा चेस करण्याच्या रेकॉर्ड मोडावे लागणार आहे.

दुसरीकडे भारताविरूद्ध सर्वाधिक धावा चेस करून सामना जिंकण्यात ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. त्यांनी 1977 मध्ये पर्थ येथे 339 धावा चेस केल्या होत्या.

England vs India What Are The 4th Inning Highest Run Chase by England
स्मृती - शेफालीची धडाकेबाज फलंदाजी; मालिकेत भारताची विजयी आघाडी

कसोटी क्रिकेट इतिहासात चौथ्या डावात सर्वाधिक धावा चेस करणारे संघ (4th Inning Highest Run Chase History)

  • वेस्ट इंडीजने 2003 ऑस्ट्रेलियाविरूद्ध 418 धावा चेस केल्या.

  • दक्षिण आफ्रिकेने 2008 ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध 414 धावा चेस केल्या.

  • भारताने 1976 मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध 406 धावा चेस केल्या होत्या.

  • ऑस्ट्रेलियाने 1948 मध्ये इंग्लंडविरूद्ध 404 धावांचा यशस्वी पाठलाग केला.

  • वेस्ट इंडीजने 2021 मध्ये बांगलादेश विरूद्ध 395 धावा चेस केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.