ENG vs NED : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपधील सर्वात तगडा संघ म्हणून शेखी मिरवण्याऱ्या इंग्लंडची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यांना साधी लीग स्टेज देखील पार करता आलेली नाही. त्यांचा सेमी फायनलच्या रेसमधून आधीच पत्ता कट झाला आहे.
आता इंग्लंड सन्मानासाठी खेळणार आहे. त्यांचे लीग स्टेजमधील दोन सामने शिल्लक आहेत. मात्र इंग्लंड सेमी फायनलमधून बाहेर पडल्यामुळे त्यांच्याकडे आता गमावण्यासारखं काही नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही.
इंग्लंडचे जरी वनडे वर्ल्डकपचे दोनच सामने शिल्लक असले तरी ते सामने 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या क्वालिफायवर परिणाम करू शकतात.
इंग्लंड आज नेदरलँडसोबत आपला लीगमधील आठवा सामना खेळत आहे. नेदरलँड्सने याच स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेला पराभवाचा धक्का देत मोठा उलटफेर केला होता. याचबरोबर त्यांनी बांगलादेशला देखील पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे नेदरलँड्सला हलक्यात घेणं बटलरच्या संघाला महागात पडू शकतं.
इंग्लंडला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होण्यासाठी नेदरलँड्स आणि पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकावं लागणार आहे. जर नेदरलँड्सला पाकिस्तानमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळायचं असेल त्यांना यंदाच्या वर्ल्डकपमधील अजून एक अपसेट द्यावा लागणार आहे. त्यांना सध्या गुणतालिकेत तळात असलेल्या मात्र बलाढ्य इंग्लंडला मात द्यावी लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.