Eng vs NZ 1st Test: लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय

इंग्लंडने ५ गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला
Eng vs NZ 1st Test Match
Eng vs NZ 1st Test Match
Updated on

Eng vs NZ 1st Test Match: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडने 5 गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे, आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सामन्याचा निकाल चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात लागला, कारण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंडला विजयासाठी फक्त 61 धावांची गरज होती.(England Win Five Wickets Eng Vs Nz Lords Test)

Eng vs NZ 1st Test Match
सचिनला मुद्दाम जखमी केलं, शोएब अख्तरने सांगितला 'तो' किस्सा

न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जो रूटच्या नाबाद ११५ धावांच्या जोरावर इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली. रूटशिवाय कर्णधार बेन स्टोक्सनेही अर्धशतक झळकावले होते. यष्टिरक्षक फलंदाज बेन फॉक्स ३२ धावांवर नाबाद राहिला, आणि यजमानांनी हा सामना पाच गडी राखून जिंकला. जो रूट 115 आणि बेन फॉक्सने 32 धावा करून नाबाद परतला. रूटने 26 वे शतक झळकवले आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला. न्यूझीलंडला चौथ्या दिवशी एकही विकेट मिळाली नाही.

Eng vs NZ 1st Test Match
रियान परागने सोडल मौन, २०२१ मध्ये मैदानात नेमकं घडलं तरी काय?

सामन्यातबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संघ 132 धावांत आटोपला होता. इंग्लंडचा संघही पहिल्या डावात केवळ 141 धावाच करू शकला. डॅरिल मिशेल 108 धावा आणि टॉम ब्लंडेल 96 यांच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि 69 धावांपर्यंत 4 विकेट पडल्या. त्यानंतर रुट आणि स्टोक्सने पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. स्टोक्स 54 धावांवर बाद झाला. रूटने बेन फोक्ससोबत पाचव्या विकेटसाठी 120 धावांची विजयी भागीदारी केली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.