बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील नवख्या संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. कार्डिफच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानच्या संघाने यजमान इंग्लंडसमोर अवघ्या 142 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर फिलीप सॉल्ट अवघ्या 7 धावा करुन परतल्यानंतर डेविड मलान आणि झॅक क्राउले या जोडीने नाबाद शतकी खेळी करत संघाला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या संघाने 21.5 षटकातच सामना खिशात घातला. डेविड मलानने 4 चौकाराच्या मदतीने 68 धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला क्राउलेनं 50 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या. या विजयासह इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या या संघात 5 खेळाडूंनी पदार्पणाचा सामना खेळला. त्यामुळे नवख्या गड्यांनी घरच्या मैदानावर पाकचा धुव्वा उडवला असेच म्हणावे लागले. (England vs Pakistan 1st ODI England won by 9 wkts After Saqib Mahmood bowling Dawid Malan Zak Crawley half century)
इंग्लंडच्या संघाचा कार्यवाहू कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. साकिब महमूदने 42 धावांत चार विकेट घेत पाकिस्तानी संघाचे कंबरडे मोडले. त्याला इतर गोलंदाजांनी उत्तम साथ दिली. दुसरीकडे पाकिस्तानच्या कर्णधाराला पहिल्या वनडे सामन्यात खातेही उघडता आले नाही. परिणामी पाकिस्तानचा डाव 35.2 षटकात 141 धावांत आटोपला. केवळ 7 वनडे सामन्यांचा अनुभव असलेल्या इंग्लिश गोलंदाजासमोर पाकिस्तानच्या संघाने अक्षरश: गुडघे टेकले.
पाकिस्तानच्या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट गमावल्या. सलामीवीर फखर झमानने 47 धावांची खेळी करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शादाब खान 30, एस मकसूद 19, मोहम्मद रिझवान 13 आणि शाहिन आफ्रिदीच्या 12 शिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला दुहेरी आकडा पार करता आला नाही. दुखापतीतून सावरुन कमबॅक करणाऱ्या आणि नवख्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या बेन स्टोक्सने गोलंदाजीही केल्याचे पाहायला मिळाले. मुख्य संघ कोरोनामुळे क्वांरटाईन असताना इंग्लंड बोर्डाने पर्यायी संघ मैदानात उतरला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.