इंग्लडच्या दोन महिला क्रिकेटपटूंनी बांधली लग्नगाठ

England women cricketers Katherine Brunt and Natalie Sciver tie the knot in a private ceremony
England women cricketers Katherine Brunt and Natalie Sciver tie the knot in a private ceremony
Updated on

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रंट आणि नताली स्कायव्हर यांनी एका खाजगी समारंभात लग्न गाठ बांधली आहे. दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

त्यासोबत इंग्लडच्या क्रिकेट संघाची कर्णधार हीदर नाइट, डॅनी व्याट, इसा गुहा, जेनी गन यांच्यासह इंग्लंड संघाचे वर्तमान आणि भूतकाळातील या खेळाडू या समारंभाला उपस्थित होते. ब्रंट आणि सायव्हर हे 2017 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आहेत. या दोघांनी 2022 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही सहभाग घेतला होता, ज्यामध्ये इंग्लंड उपविजेते ठरले होते.

England women cricketers Katherine Brunt and Natalie Sciver tie the knot in a private ceremony
राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या एकदिवसीय जागतिक स्पर्धेत, सायव्हरने 121 चेंडूत 148 धावांची नाबाद खेळी खेळली होती मात्र या सामन्यात इंग्लडला चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

सायव्हरने ऑक्टोबर 2019 मध्ये ब्रंटशी तिची प्रतिबद्धता जाहीर केली होती. हे जोडपे सप्टेंबर 2020 मध्ये लग्न करणार होते परंतु कोविड-19 साथीच्या आजारामुळे त्यांना त्यांच्या लग्नाला उशीर करावा लागला.

England women cricketers Katherine Brunt and Natalie Sciver tie the knot in a private ceremony
स्त्री कुणापेक्षाही कमी नाही, UPSC च्या निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()