ENG W vs IND W : यजमान इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी

शफाली वर्माचा हा पदार्पणातील सामना आहे. कसोटीमध्ये ज्याप्रमाणे तिने दोन्ही डावात अर्धशतकी खेळीसह दमदार डेब्यू केला तसेच वनडे पदार्पण करेल, अशी आस आहे.
England Women vs India Women
England Women vs India WomenTwitter

England Women vs India Women 1st ODI : टॅमी ब्यूमोंटची 87 धावांची नाबाद खेळी आणि तिला उत्तम साथ देत नताली साइवरने केलेल्या नाबाद 74 धावांच्या जोरावर इंग्लंड महिलांनी वनडे मालिकेत विजयी सलामी दिली. तीन सामन्यांच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी कोलमडल्याचे पाहायला मिळाले. स्मृती मानधना 10 (25), शफाली वर्मा 15 (14) धावा करुन स्वस्तात माघारी फिरल्या.

मिताली राजच्या 108 चेंडूतील 72 धावा आणि पूनम राउत (32), दीप्ति शर्मा (30) धावानंतर भारतीय संघाने 8 बाद 201 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या महिला संघाने 8 गडी राखून हे लक्ष्य सहज पार केले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. झुलन गोस्वामी आणि एकता बिश्त यांनी प्रत्येकी एक -एक विकेट घेतली. इंग्लंडच्या महिला संघाने 34.5 षटकातच सामना खिशात घातला.

इंग्लंडमधील ब्रिस्टलच्या मैदानात इंग्लंड आणि भारतीय महिला संघ यांच्यात वनडे सामना रंगला होता. इंग्लंड महिला संघाची कर्णधार हेथर नाईट हिने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. या दोघी अपयशी ठरल्याच त्याच्याशिवाय हरमनप्रित कौरलाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही.

83-2 (15.5) : एकता बिश्त इंग्लंडची कर्णधार हेथर नाईट हिला अवघ्या 18 धाावांवर धाडले माघारी

38/1 (6.4) : झुलन गोस्वामीनं इंग्लंड महिलांना दिला पहिला धक्का, विनफील्ड हिल 20 चेंडूत 16 धावा करुन माघारी

भारतीय महिला संघ

मिताली राज 72 (108)

पूनम राउत 32 (61)

दीप्ती शर्मा 30(46)

इंग्लंड महिला गोलंदाज

इक्लेस्टोन 10-1-40-3

श्रुबसोल 8-3-33-2

के ब्रंटे 10-0-35-2

भारतीय महिला संघाने निर्धारित 50 षटकात 8 बाद 201 धावा केल्या आहेत.

197-8 (48.4) : ब्रंटने तानिया भाटियाच्या रुपात घेतली वैयक्तिक दुसरी विकेट

192-7 (47.2) : पूजा वस्त्रारकर 17 चेंडूत उपयुक्त 15 धावांची खेळी करुन माघारी

180-6 (45.3) : अर्धशतकानंतर मिताली माघारी, एक्लेस्टोन हिने केलं बोल्ड. तिने आपल्या खेळीत 108 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने 72 धावा केल्या

एक्लेस्टोन


कर्णधारपदाला साजेसा खेळ करत मिताली राजनं चौकार खेचत पूर्ण केलं अर्धशतक

149-5 (41.3) दीप्ती शर्मा 46 चेंडूत 30 धावांची खेळी करुन माघारी

84-4 (27.2) : उपकर्णधार हरमन प्रित अवघ्या एका धावेची भर घालून माघारी

83-3 (25.2) : पूनम राउतच्या रुपात टीम इंडियाला आणखी एक धक्का; केट क्रॉसला मिळाले यश

27-2 (9.4) भारतीय संघाला आणखी एक धक्का, सलामीची स्फोटक फलंदाज स्मृती मानधनाही माघारी, तिने 25 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत 10 धावांची भर घातली. शफालीचा कॅच घेणाऱ्या अन्या श्रुबसोले तिची विकेट घेतली

23-1 (4.5): शफालीच्या रुपात भारतीय महिला संघाला पहिला धक्का, पदार्पणाच्या सामन्यात शफाली 3 चौकाराच्या मदतीने 14 चेंडूत 15 धावा करुन माघारी. कॅथरीन ब्रंटच्या गोलंदाजाीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तिने अन्या श्रुबसोलेकडे दिला झेल

असा आहे इंग्लंड महिला संघ

लॉरेन विनफिल्ट हिल, टॅमी ब्यूमॉन्ट, हेदर नाईट(कर्णधार), टॅमी ब्यूमॉन्ट, हेदर नाईट (कर्णधार), नताली सायव्हर, अ‍ॅमी एलेन जोन्स(विकेट किपर),सोफिया डन्कले, कॅथरीन ब्रंट, सारा ग्लेन, सोफी इक्लेस्टोन, अन्या श्रुबसोले, केट क्रॉस.

असा आहे भारतीय महिला संघ

स्मृती मानधना, शफाली वर्मा, पुनम राउत, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रित कौर, दिप्ति शर्मा, तानिया भाटिया (विकेट किपर), शिखा पांडे, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्रारकर, एकता बिस्ट

शफाली वर्माचे वनडे पदार्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.