England Women vs India Women 2nd ODI : सोफिया डंकलेची 81 चेंडूतील 73 धावांची नाबाद खेळी आणि कॅथरीन ब्रंटने नाबाद 33 (46) धावा करत तिला दिलेली साथ याच्या जोरावर दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाला 5 विकेट्सनी पराभूत केले. या विजयासह इंग्लंड महिला संघाने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. झुलन गोस्वामीने इंग्लंडची सलामी जोडी अवघ्या 16 धावांवर फोडली. तिने टॅमी ब्यूमॉन्ट हिला अवघ्या 10 धावांवर तंबूत धाडले. या विकेट्स भारतीय संघाने गोलंदाजीत उत्तम सुरुवात केली. कर्णधार हेदर नाईट देखील 10 धावांची भर घालून माघारी फिरली.
पूनम यादनने तिच्या रुपात भारतीय महिला संघाला दुसरे यश मिळवून दिले. शिखा पांडेनं सलामीची फलंदाज लॉरेन विनफिल्ड हील तंबूत धाडले. तिने 42 धावांची खेळी केली. स्नेह राणाने मध्यफळीतील फलंदाज नॅटली स्कायवर हिला अवघ्या 19 धावांवर चालते केले. एमी एलन जोन्स 28 धावा करुन पूनम यादवच्या जाळ्यात अडकली. पण सोफिया डंकले आणि कॅथरीन ब्रंट जोडीने भारतीय संघाच्या पल्लवित झालेल्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले. या दोघींनी शेवटपर्यंत मैदानात थांबत 15 चेंडू आणि 5 विकेट राखून संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक 2 तर झुलन, शिखा आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
इंग्लंडची कर्णधार हिदर नाईट हिने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. स्मृती मानधना आणि शफाली वर्माने भारताच्या डावाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. केट क्रॉसने 22 धावांवर खेळणाऱ्या स्मृतीला बोल्ड केलं. त्यानंतर मैदानात उतरलेली रॉड्रिग्ज अवघ्या 8 धावा करुन परतली. शफाली वर्मा 44 धावा करुन बाद झाल्यानंतर भारतीय महिला संघाचा डाव पुन्हा कोलमडला. मिताली राजने पुन्हा एकदा नेतृत्वाला साजेसा खेळ केला. 92 चेंडूत 59 धावा करणारी मितालीला अन्य कोणाचीही साथ मिळाली नाही. ती धावबाद झाली. हरमनप्रित कौर 19, तळाच्या फलंदाजीत झुलन गोस्वामी 19 आणि पूनम यादवच्या 10 धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने निर्धारित 50 षटकात सर्व बाद 221 धावा केल्या होत्या. (England Women vs India Women 2nd ODI Smriti Mandhana Shafali Verma Jemimah Rodrigues Mithali Raj Harmanpreet Kaur)
इंग्लंड महिला संघासमोर 222 धावांचे लक्ष्य
221-10 (49.6) : डावातील अखेरच्या चेंडूवर पूनम यादवही झाली बाद
192-9 (46.2) : एका बाजूने खिंड लढवून मालिकेत सलग दुसरे अर्धशत झळकवलेली मिताली रन आउट
181-8 (43.5) : शिखा पांडेही स्वस्ता माघारी. तिनेही दोनच धावा केल्या
178-7 (42.2): तानिया भाटियाच्या रुपात भारतीय महिला संघाला आणखी एक धक्का, तिने धावसंख्येत अवघ्या 2 धावांची भर घातील
168-6 (39.1) : कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव टाळणाऱ्या स्नेह राणानेही 7 बॉलमध्ये 5 धावा काढून सोडली मितालीची साथ
160-5 (37.2) : दीप्ति शर्मा अवघ्या 5 धावांची भर घालून परतली. कॅट क्रॉसला मिळाले यश
145-4 (33.5) : हरमनप्रित कौरने सोडली मितालीची साथ, केट क्रॉसला तिसरे यश. कर्णधार-उप कर्णधार दोघींनी मिळून 68 धावांची भागीदारी केली.
77-3 (16.4) सेट झालेली शफालीही परतली, इक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर जोन्सचं अप्रतिम स्टंपिंग. शफालीनं 55 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने केली 44 धावांची खेळी
76-2 (15.4) : जेमिमा रॉड्रिग्जच्या रुपात भारतीय संघाला दुसरा धक्का, कॅट क्रॉसलाच मिळाले दुसरे यश
56/1 (11.5) : कॅट क्रॉसने स्मृती मानधनाला केलं बोल्ड, तिने 30 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 22 धावांची खेळी केली
भारतीय संघ तीन बदलासह मैदानात उतरला आहे. पहिल्या सामन्यात बाकावर बसलेल्या स्नेह राणा, पूनम यादव आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांना संघात स्थान मिळाले आहे.
इंग्लंड महिला संघाची कर्णधार हेथर नाईट हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.