Manchester City won EPL: मँचेस्टर युनायटेडच्या पराभवानंतर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रिमियर लीगच्या ट्रॉफीवर (English Premier League Title) कब्जा केला. 10 वर्षांत त्यांनी पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. इंग्लिश प्रीमियर लीग (EPL) च्या लढतीत लिसेस्टर सिटीने आपल्या घरच्या मैदानावर मँचेस्टर युनायटेडला 2-1 असे पराभूत केले. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीने टायटलवर आपले नाव कोरले.
मँचेस्टर सिटीच्या संघाला शनिवारी झालेल्या चेल्सी विरुद्धच्या लढतीत 1-2 असा पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवानंतर मँचेस्टर सिटीला जेतेपदासाठी प्रतिक्षेत राहण्याची वेळ आली. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आणि पेप गार्डियोला यांच्या मार्गदर्शनाखालील मँचेस्टर सिटीने पाचव्यांदा बाजी मारली.
मँचेस्टर युनायटेडने रविवार एस्टन विला क्लबला पराभूत केले होते. टायल जेतपदासाठी त्यांना आणखी एका विजयाची गरज होती. 10 बदलासह उतरलेल्या मँचेस्टर युनायटेडला लिसेस्टर सिटीने जेतेपदापासून रोखले. लिसेस्टर सिटीच्या ल्यूक थॉमसने 10 व्या मिनिटाला संघाला गोल करुन दिला. केगलर सोयोन्कुने 66 व्या मिनटाला दुसरा गोल डागला. या गोलमुळे प्रतिस्पर्धी युनायटेडकडून मेसन ग्रीनवूडने 15 व्या मिनिटाला डागलेला गोलचे मोल कमी झाले.
जेतपदानंतर मँचेस्टर सिटीचे कोच गार्डियोला म्हणाले की, स्पेन आणि जर्मनीमधील लीगच्या तुलनेत ही लीग जिंकणे खूप कठिण काम आहे. त्यामुळे दहा वर्षांत पाच वेळा जेतेपद मिळवणं खूप महत्त्वपूर्ण ठरते. मँचेस्टर सिटी शुक्रवारी न्यूकॅसल विरुद्ध सामना खेळणार आहे. 23 मेला ते लीगमधील अंतिम सामना खेळतील. त्यानंतर 29 मे रोजी चेल्सीविरुद्ध ते चॅम्पियन लीगमधील फायनल सामना खेळतील.manchester city won premier league title for 5time in 10 years
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.