Euro Cup Quarter Final : ग्रुप ऑफ डेथ मधून वाटचाल करणाऱ्या गतविजेता फ्रान्स, दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल, माजी विजेता जर्मनीची नवख्या संघानी जिगरबाज खेळ करून युरो कपमध्ये ‘सडनडेथ’ केली. फिफा मानांकानात अव्वल असणारा बेल्जियम आणि माजी विजेता इटली यांच्यातील हाय व्होल्टेज लढत लक्षवेधी आहे. बलाढ्य फ्रान्सला नमविणाऱ्या स्वित्झर्लंडची माजी विजेता स्पेनशी काटाजोड सामना आहे. युरोच्या इतिहासात प्रथमच उपात्यंपूर्व फेरीत पोहचलेल्या युक्रेनची तुल्यबळ इग्लंड विरूध्द डाळ शिजणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Euro 2020 European Championship quarterfinals Switzerland Spain Belgium Italy Czech Republic And Denmark)
एरिक्सनसाठी सारे काहीं म्हणून झपाटून खेळणाऱ्या डेन्मार्कला तुल्यबळ नेदरलँडला धुळ चाळणाऱ्या चेक प्रजासत्ताकशी झुंझावे लागणार आहे. त्यामुळेच उद्या पासून होणा-या युरो सुपर 4 स्थानासाठी (उपांत्य फेरी) रंगणाऱ्या जुगलबंदीकडे तमाम फुटबॉलविश्वाचे लक्ष लागून आहे.
मिनी विश्वचषक स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी युरो कप फुटबॉल स्पर्धा सामन्यागणिक रंगत चालली आहे. जागतिक फुटबॉलमध्ये बलाढ्य म्हणून दबदबा असणाऱ्या जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल या संघाचा फडशा पाडत स्वित्झर्लंड, बेल्जियम, चेक प्रजासत्ताक संघानी आधुनिक फुटबाँलमध्ये कोणाची मक्तेदारी नसल्याचे अधोरेखित केले. इतिहासापेक्षा वर्तमानातील झुंझार खेळच संघाला तारू शकतो हेच त्यांनी जणू स्पष्ट केले आहे. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, एम्बापे यांच्यावर अंवलंबन असणाऱ्या पोर्तुगाल, फ्रान्सला फुटबॉल हा सांघिक खेळ असल्याचे बेल्जियम आणि नवख्या स्वित्झर्लंडने दाखवून दिले.
तुलनेत सोपा गट म्हणून ओळखल्या जाणारा ब गटातून अपेक्षेप्रमाणे तीनही सामने सहज जिंकत आगेकूच करणाऱ्या बेल्जियमने पोर्तुगालला पराभवाचा झटका देत घौडदौड कायम ठेवली आहे. बेल्जियमचे अनुभवी बचावपटू टाँबी आल्डरवेल्ड, यान वेर्टोघेन, थाँमस वर्माएलन यांनी चिकटीपुर्ण खेळ करीत ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि सहकायांना नामोहरम केले. तुलनेत सन 2018 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र न ठरलेल्या इटलीने अंग झटकून गेल्या दोन वर्षात कमालीचा खेळ उंचावात अपराजित सामन्यांची मालिका गुंफली आहे. इटलीचे प्रशिक्षक मँन्सिनी यांनी संघातील सर्व खेळाडूंना रोटेशनने संधी देत गटात अव्वल येत त्यांनी जादा वेळेत आँष्ट्रियावर मात करीत उपात्यंपूर्व फेरी गाठली. त्यामुळेच हा सामना उत्कंठावर्धक होणार हे ऩिश्चित.
चेंडूवर हुकमुत राखणारा स्पेनने गटात दुसरे येत विश्वकरंडक उपविजेत्या क्रोएशियाला जादावेळेत 5-3 अशी मात केली. स्पेनेचे सुपर खेळाडूंनी जादावेळेत सामन्याचे चित्रच पालटले. स्टार खेळाडूंच्या भरणा असणाऱ्या फ्रान्सला पराभवाचा झटका देणाया स्वित्झर्लंडशी स्पेनचा कस लागेल. जर्मनीचे आव्हान मोडून काढणारा इंग्लडचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. या स्पर्धेत जबरदस्त फाँर्ममध्ये असणारा स्ट्रायकर पाँल स्टरर्लिंगने प्रत्येक विजयात सिंहाचा वाटा उचलला. स्विडनला हरविणाऱ्या युक्रेनला इंग्लडशी दोन हात करताना सर्वस्वपणाला लावावे लागेल. पहिल्याच सामन्यात ह्द्यविकाराने स्पर्धेबाहेर असलेल्या एरिक्सनची प्रेरणा घेत खेळणाया डेन्मार्कची पोर्तुगालला आऊट करणारा स्वित्झलँडचे आव्हान पेलावे लागणार आहे.
सुपर सब निर्णायक..
नॉकआऊट सामन्याच चुरस दिसली. विशेषत सामन्याचा निकाल शेवटच्या टप्यात अथवा जादा वेळेत लागला. खासकरुन बदली खेळाडू म्हणून आलेल्या इटलीच्या तर स्पेनचा आल्वोरा मोराटा, मिकेल ओयाझार्बल यांनी संघासाठी धावत अनमोल गोल करुन संघाला जल्लोषाची संधी दिली
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.