लंडन: इंग्लंड (england) आणि इटाली (italy) या युरोपातील दोन बलाढ्य संघांमध्ये रविवारी युरो कप २०२० स्पर्धेचा (euro cup 2020 final) अंतिम सामन्याचा थरार रंगला होता. पेन्लटी शूट आऊटमध्ये (penalty shoot out) निकाल लागलेल्या या सामन्यात अखेर इटलीने बाजी मारली. लंडनच्या वेम्बले स्टेडियमवर (wembley stadium) अंतिम सामन्याचा थरार रंगला होता. इटलीने मिळवलेला हा विजय इंग्लिश चाहत्यांना पचवता आला नाही. वेम्बले स्टेडियमच्या बाहेर इंग्लिश आणि इटालियन फुटबॉल चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पराभव पचवता न आल्याने इंग्लिश चाहत्यांनी उगचाच इटालियन फुटबॉलप्रेमींवर हल्ला केला. (EURO 2020 final at wembley after lost english fans attack italians)
इंग्लिश चाहते फक्त इटालियन फुटबॉलप्रेमींवर हल्ला करुनच थांबले नाहीत, तर त्यांनी वर्णद्वेषी शेरेबाजी केली. इटालीच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला. सोशल मीडियावर इंग्लिश चाहत्यांच्या बेशिस्त वर्तनाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. १९६६ नंतर प्रथमच इंग्लंड एका मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामुळे वेम्बले स्टेडियमच्या बाहेर मोठ्या संख्येने इंग्लिश फुटबॉलप्रेमी जमा झाले होते.
विजयानंतर आपल्याला जल्लोष, पार्टी करण्याची संधी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसं काहीच घडलं नाही. उलट इंग्लंडची प्रतिमा डागळेल, असं वर्तन दिसलं. युरोच्या इतिहासातील सर्वात जलद गोल डागत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या मिनिटाला आघाडी घेतली होती. पहिल्या हाफमधील दुसऱ्या मिनिटाला ल्युक शॉने इंग्लंडसाठी पहिला गोल डागला. सामना सुरु झाल्यानंतर 1 मिनिट आणि 57 सेकंदातील हा गोल युरोच्या इतिहासातील सर्वात जलद गोल ठरला.
लंडनमधील वेम्बलेच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात पहिल्या हाफमध्ये इंग्लंडने 1-0 अशी आघाडी कायम राखली. दुसऱ्या हाफमध्ये लिओनार्डो बोनसीने इटलीच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. त्याने 67 व्या मिनिटाला स्कोअर 1-1 बरोबरीत आणला. एक्स्ट्रा टाईममध्ये सामना 1-1 बरोबरीत राहिल्यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटमध्ये गेला. यात इंग्लंडने एक पेनल्टी मिस केली तर इटलीचा गोली जियानलुगी डोन्नरम्मा दोन पेनल्टी रोखून दाखवत इटलीच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.