Euro 2020 Own goals Record : फुटबॉलच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या गोल पोस्टमध्ये गोल डागण्याऐवजी अनावधाने खेळाडूकडून आपल्याच गोल पोस्टमध्ये गोल झाल्याचे पाहायला मिळते. अशा गोलला स्वंय गोल किंवा आत्मघातकी गोल (Own Goals) असे म्हणतात. 1960 पासून रंगणाऱ्या युरो कप स्पर्धेत आतापर्यंत 18 वेळा आत्मघातकी गोलची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या स्पर्धेत झालेल्या 9 स्वंय गोलची बरोबरी यंदाच्या हंगामात झालीये. स्पेन आणि क्रोएशिया यांच्यातील नॉक आउटच्या सामन्यात स्पेनचा मिडफिल्डर पेड्रीने (PEDRI) आपल्या गोलीकडे लाँग पास केला. (Euro 2020 Own goals Record spain vs croatia goalkeeper Unai Simon Miss midfielder Pedri long back pass Watch Viral Video)
स्पॅनिश गोल किपर सिमन (Unai Simon) हा बॉल ड्रिबल करायला गेला. पण बॉलचा आणि त्याच्या पायाचा काहीही संबंध आला नाही. परिणामी हा गोल परेडीच्या नावे नोंद झाला. हा आत्मघातकी गोल स्पेनला चांगलाच महागात पडला असता पण एक्स्ट्रा टाईममध्ये पुन्हा दोन गोल करुन त्यांनी ही चूक भरून काढली. यंदाच्या स्पर्धेतील हा नववा स्वंय गोल ठरला. सोशल मीडियावर सीमनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. गोल किपर जेव्हा ड्रिबल करतो तेव्हा त्याला किती स्ट्रगल करावा लागतो, याचा अंदाजा सिमनकडे बघताना येतोय, अशा काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
1960 पासून रंगणाऱ्या युरो स्पर्धेतील पहिला स्वंयगोल हा 1976 च्या हंगामात नोंदवला गेला होता. युगोस्लोवियामध्ये नेदरलँड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये चेकोस्लोवाकियाअँटोन ओन्ड्रू या डिफेंडरकडून पहिल्यांदा स्वंय गोलची नोंद झाली होती. या सामन्यातही स्वंय गोल करणारा चेकोस्वोवाकियालाच विजय मिळला होता. स्पेननेही स्वंय गोल केल्यानंतर पिछाडीवरुन सामना खिशात घातल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात सेंटर बॅकला खेळणाऱ्या तुर्कीच्या मेरीह डिमिरल याने इटली विरुद्ध स्वंयगोल केला होता.
या सामन्यात इटलीने त्यांचा 3-0 असा धुव्वा उडवला होता. पोलंडचा गोलकिपर वोजीएच स्क्झॅस्नी, जर्मनीच्या सेंट्रल बॅकची धूरा पेलणारा मॅट्स हम्मेल्स, पोर्तुगालचा रोबेन डायस आणि राफॅल गुरेरो, फिनलँडचा गोलकिपर लुका हृदिके, स्वोवाकियाचा गोलकिपर मार्टिन डेब्रावका आणि जुराज कुक्का यांच्याकडून स्वंय गोल झाले होते. यापूर्वीच्या 15 हंगामात केवळ 9 स्वंय गोल पाहायला मिळालेत. यंदाच्या हंगामातील आणखी काही सामने बाकी असताना 9 गोलचा कोठा पूर्ण झालाय. त्यामुळे हा एक विक्रम यंदाच्या हंगामात नोंद होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.