EURO 2020 Belgium vs Portugal : वर्ल्ड नंबर वन बेल्जियमने गत विजेत्या पोर्तुगलाचे स्पर्धेतील दरवाजे बंद केले. पहिल्या हाफमधील अवघे काही मिनिटे बाकी असताना थॉरगन हेझार्डने बेल्जियमला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने 43 व्या मिनिटाला हा गोल डागला. या सामन्यापूर्वी रोनाल्डो-लुकाकू यात हिरो कोण ठरणार? अशी चर्चा रंगली होती. पण या दोघांशिवाय हेझार्डने आपल्यातील हिरोगिरी दाखवून दिली. त्याचा युरोतील बॅक टू बॅक सामन्यातील दुसरा गोल ठरला. ही आघाडी शेवटपर्यंत कामय ठेवत बेल्जियमने रोनाल्डोच्या पोर्तुगालचा खेळ खल्लास केला. आता बेल्जियमचा संघ क्वार्टर फायनलमध्ये इटलीच्या संघाशी भिडेल.
डेथ ग्रुपमध्ये पोर्तुगालने हंगेरीला 3-0 असे नमवले होते. जर्मनी विरुद्धच्या दोन स्वंय गोलमुळे त्यांना 2-4 असा पराभव स्विकारावा लागला होता. वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सला 2-2 असे बरोबरीत राखत तिसऱ्या स्थानावर राहत पोर्तुगाल नॉक आउटमध्ये पोहचला होता. रोनाल्डोवर जेतेपद कायम ठेवण्याची जबाबदारी होती. पण त्याला या सामन्यात गोल करता आला नाही.
आतापर्यंतच्या सामन्यात रोनाल्डोने सर्वाधिक गोल डागण्याचा पराक्रम केलाय. पण त्याला महत्त्वाच्या सामन्यात संघासाठी विजयी गोल डागता आला नाही. या सामन्यात रोमेलू लुकाकू आणि रोनाल्डो यांच्यात गोलची चुरस पाहायला मिळेल, असा अंदाज फुटबॉल जगतातून लावण्यात आला होता. पण सामन्याचा हिरो हेझार्ड ठरला. त्याने डागलेल्या गोलच्या जोरावर बेल्जियमने दिमाखात क्वार्टर फायनल गाठली.
या सामन्यापूर्वी रोनाल्डोने इराणच्या अली दाई यांच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलची बरोबरी केली होती. त्याच्या खात्यात 109 गोल आहेत. नॉक राउंडमध्ये गोल डागून तो नवा विश्वविक्रम प्रस्थापित करेल, याकडे त्याचे चाहते डोळे लावून बसले होते. मात्र त्याचा हा विश्वविक्रम आता लांबणीवर पडलाय.
नॉक राउंडमधील पुढच्या फेरीत बेल्जियम आणि इटली यांच्यात सामना रंगणार आहे. इटलीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी बाद फेरीतील पहिल्या सामन्यात नवख्या ऑस्ट्रियाने त्यांना चांगलेच दमवलं होते. स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवण्यासाठी त्यांना एक्स्ट्रा टाईमपर्यंत लढावे लागले होते. त्यामुळे इटलीच्या तुलनेत बेल्जियमचा संघ तगडा दिसतोय. भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी 3 जुलैला मध्यरात्री 12.30 वाजता रंगणाऱ्या सामन्यात इटली तगडी फाईट देणार का? हे त्यादिवशीच कळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.