गोलची बरसात! एक्स्ट्रा टाईममध्ये स्पेनकडून क्रोएशियाला 'पेन'

1960 मध्ये पहिल्या वहिल्या युरो कप स्पर्धेत फ्रान्स आणि युगोस्लाविया यांच्यातील सेमीफायनलमध्ये 9 गोलची नोंद झाली. होती. स्पेन आणि क्रोएशिया यांच्यात एक्स्टा टाईमपर्यंत गेलल्या सामन्यात 8 गोलची नोंद झाली.
Croatia vs Spain
Croatia vs Spain Twitter
Updated on

EURO 2020 : युरोच्या मागील हंगामासह फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत नॉक आउटच्या पहिल्या सामन्यात बाद झालेल्या स्पेनने यंदाच्या युरोची क्वार्टर फायनल गाठली आहे. रंगतदार झालेल्या सामन्यात स्पेनने एक्स्ट्रा टाईममध्ये 5-3 असा विजय नोंदवत क्रोएशियाच्या स्पर्धेतील प्रवासाला ब्रेक लावला. या सामन्यात तब्बल 8 गोलची बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. स्पेनने स्वयंगोलामुळे क्रोएशियाला आघाडी दिली. त्यानंतर पिछाडीवरुन त्यांनी निर्धारित वेळेत बाजी मारण्याचे संकेत दिले. पण क्रोएशियाने 3-3 असा सामना बरोबरीत आणला. त्यानंतर 30 मिनिटांच्या एक्ट्रा टाईममध्ये एकतर्फी वर्चस्व राखत स्पेनने विजय नोंदवला.

डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगच्या मैदानात रंगलेल्या स्पेन आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्यात गोलची अक्षरश: बरसात झाल्याचे पाहायला मिळाले. 1960 मध्ये पहिल्या वहिल्या युरो कप स्पर्धेत फ्रान्स आणि युगोस्लाविया यांच्यातील सेमीफायनलमध्ये 9 गोलची नोंद झाली. होती. स्पेन आणि क्रोएशिया यांच्यात एक्स्टा टाईमपर्यंत गेलल्या सामन्यात 8 गोलची नोंद झाली.

Croatia vs Spain
T20 वर्ल्डकप भारतात नव्हे UAE ला होणार; BCCIचं शिक्कामोर्तब!

पहिल्या हाफमधील 20 व्या मिनिटाला स्पेनच्या पेड्रीने गोलकिपर सीमनकडे चेंडू पास केला. तो ड्रिबलिंग करताना चुकला आणि स्पेनच्या स्वंय गोलमुळे क्रोएशियाला आघाडी मिळाली. त्यानंतर पबलो सर्बियाने 38 व्या मिनिटाला संघाला 1-1 अशी आघाडी मिळवून दिली. 57 व्या मिनिटाला सीज़र अज़पिलिकुएटा त्यानंतर 76 व्या मिनिटाला फेरॉन टॉरेस याने आघाडी मजबूत केली. गेम स्पेनच्या बाजूने झुकलाय असे वाटत असताना क्रोएशियाने कमालीचे कमबॅक केले.

Croatia vs Spain
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत राहीचा सुवर्णवेध

85 व्या मिनिटाला मिसलव ऑरसिक आणि 90 मिनिटानंतर मिळालेल्या 6 मिनिटांच्या लाइफ लाईनमध्ये मारिया पॅसालिकने सामना 3-3 असा बरोबरीत आणला. एक्स्ट्रा टाईममध्ये अल्वेला मोटेरा (100 व्या मिनिटाला) आणि मिकल ओयर्झाबलने (103 मिनिटाला) स्पेनला आघाडी मिळवून दिली. या दोघांनी एक्स्ट्रा टाईममध्ये मिळवून दिलेल्या आघाडीनंतर स्पेनने 5-3 असा विजय नोंदवला.

स्पेनच्या संघाने आतापर्यंत तीन वेळा युरो कप स्पर्धा जिंकली आहे. 2008 आणि 2012 सलग दोनवेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रमही त्यांच्या नावे आहे. पण मागील वर्षीच्या नॉक आउट राउंडमध्ये इटलीने त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. 2018 मध्ये झालेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये रशियाने त्यांना नॉक आउट राउंडच्या पहिल्या मॅचमध्ये बाहेरचा रस्ता दाखवला होता. 2012 नंतर अखेर स्पेनचा संघ मोठ्या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरलाय. फ्रान्स आणि स्वित्झर्लंड यांच्यातील विजेत्या संघासोबत त्यांना क्वार्टफायनलमध्ये भिडावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.