Euro 2024 : 12 वर्षांनंतर स्पेन फायनलमध्ये! उपांत्य फेरीत फ्रान्सला 2-1ने चारली धूळ, 4 मिनिटांत केलं दोन गोल

Spain Vs France Semifinal : तब्बल 12 वर्षांनंतर स्पेनने युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी जर्मनीच्या बर्लिन येथील अलियान्झ एरिना येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत जर्मनीने फ्रान्सचा 2-1 असा पराभव केला.
Euro 2024 Spain beat France 2-1 to reach final
Euro 2024 Spain beat France 2-1 to reach finalsakal
Updated on

Euro 2024 Spain beat France : तब्बल 12 वर्षांनंतर स्पेनने युरो कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी जर्मनीच्या बर्लिन येथील अलियान्झ एरिना येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत जर्मनीने फ्रान्सचा 2-1 असा पराभव केला.

आता अंतिम फेरीत रविवारी इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीत विजेत्या संघाशी सामना होईल. याआधी स्पेनने 2012 मध्ये इटलीला हरवून अंतिम फेरी गाठली होती.

Euro 2024 Spain beat France 2-1 to reach final
IND vs ZIM 3rd T20I : कर्णधार गिल टेन्शनमध्ये! तीन खेळाडूंच्या 'एन्ट्री'मुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये बदल निश्चित

स्पेनच्या विजयाचे खरं हिरो 16 वर्षीय लॅमिने यामल आणि दानी ओल्मो आहे. दोघांनी संघासाठी 1-1 गोल केला. सामन्याच्या पहिल्या 10 मिनिटांत एक गोल करून फ्रान्सने आघाडी घेतली होती, मात्र 15 मिनिटांनंतर स्पेनने पहिला गोल नोंदवून बरोबरी साधली आणि त्यानंतर अवघ्या 4 मिनिटांनी गोल करून आघाडी घेतली.

Euro 2024 Spain beat France 2-1 to reach final
ICC Player Rankings : आयसीसीच्या जून महिन्यातील बुमरा, मानधना ठरले सर्वोत्तम खेळाडू

सामन्याच्या पूर्वार्धातच दोन्ही संघांनी तिन्ही गोल केले होते. सामन्याच्या 7व्या मिनिटाला फ्रान्सचा कर्णधार कायलियन एमबाप्पेने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हूकला. अवघ्या दोन मिनिटांनंतर, एमबाप्पेकडे बॉल होता, त्याने कोणताही विलंब न लावता तो आपल्या सहकाऱ्याकडे पास केला आणि कोलो मुआनीने हेडरने बॉल गोलपोस्टमध्ये मारून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

पण फ्रान्स संघ आणि त्याच्या चाहत्यांचा आनंद फार काळ टिकला नाही, अवघ्या 15 मिनिटांनी स्पेनने बरोबरी साधली. 16 वर्षीय लॅमिने यामलने गोल करत स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. मग 4 मिनिटांनंतर म्हणजेच 25व्या मिनिटाला डॅनी ओल्मोने गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. स्पेनची आघाडी अखेरपर्यंत अबाधित राहिली आणि संघाने हा सामना 2-1 असा जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.